२३-४-१९३९ संस्थानांत राहणाऱ्या लोकांची स्थिती गोठ्यात कोंडलेल्या जनावरांपेक्षा वेगळी नाही - Page 304

२६६ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

आहोत ही कबुली देण्यास कोणास लाजण्याचे काहीच कारण नाही. प्राचीन

काळचे रामकृष्णासारखे नावाजलेले चांगले चांगले नामांकित राजे घेतले तरी

त्यांनी लोकात शिक्षणप्रसार व्हावा म्हणून काय स्कॉलरशिपा दिल्या होत्या ? या

फलटण संस्थानातील आपली जनता ज्ञानहीन व अधिकारहीन अशी आहे. आपल्या

लोकांच्या या स्थितीस जर कोणी जबाबदार असेल तर तो आपला धर्मच होय ! देशातील शेकडा ९० लोक आज अज्ञानात व गुलामीत दिवस कंठीत आहेत. याला जर कोणी कारण असेल तर तो हिंदू धर्मच होय. इतकेच काय पण हिंदुस्थानचे स्वातंत्र्य घालविण्यास व जो कोणी परकीय राजा इकडे येईल त्याला प्रथम आश्रय देऊन पुढे त्यासच शरण जाण्याला जर काही कारण झाले असेल तर आपला हिंदू धर्मच होय.

ही पद्धती नष्ट करण्याला आपण आज काय केले पाहिजे हा मुख्य प्रश्‍न आहे. याबाबत रामबाण उपाय अगर तोडगा म्हणून जर सुचवावयाचा असला तर तो म्हणजे राज्याची सत्ता काढून घेऊन ती प्रजेच्या ताब्यात देणे जरुर आहे. याबाबतचे माझे विचार आपणास जरा विचित्र वाटतील. परंतु मला ते लपवून ठेवावयाचे नाहीत. इंग्रज आमदानी इकडे सुरू होऊन बरेच दिवस झाल्यानंतर लोककल्याण करणे असल्यास राजकीय सत्ता प्रजेच्या प्रतिनिधींच्या हातात असणे योग्य असे वाटू लागले. त्याबाबत लोकांच्या आकांक्षा सारख्या वाढीस लागल्या. त्यांना अनुसरून ज्या काही सुधारणा अंमलात आल्या आहेत, त्या आपल्या या हिंदुस्थान देशात १९३७ च्या एप्रिल पासून सुरु झाल्या आहेत. परंतु मिळालेल्या या प्रजासत्ताक राज्यापासून या देशाचे काय हित झाले आहे ? खरे पाहाता आपल्या या देशात प्रजासत्ताक राज्यपद्धतीमुळे कवडीचासुद्धा फरक झाल्याचे दिसत नाही. परकीय इंग्रजांच्या आमदानीत जे त्यांनी केले नाही, ते हे लोक करताना दिसतात. ज्या गोष्टीबद्दल त्यांना लाज वाटत असे त्या गोष्टी

आज लोकांच्या मतावर निवडल्या गेलेल्या लोकांनी केल्या आहेत. निःशस्त्र

असलेल्या कामगारांवर गोळ्या झाडून त्यांचे जीव घेणे, पोटासाठी झगडत असता संप करणे हा गुन्हा आहे, असे कायदे जे मागचे सरकार करू शकले नाही ते ही काँग्रेसची सरकारे बिनदिक्कत करीत सुटले आहेत.

प्राचीनकाळची गो-ब्राह्मण प्रतिपाल करणे ही शिकवणूक आज तरी लोकांच्या व्यवहारातून सुटली आहे काय? आज काँग्रेसची सात प्रांतात सरकारे आहेत. त्या सर्व प्रांतांचे मुख्य दिवाण ब्राह्मण आहेत. म्हणजेच त्या सर्व प्रांतांची सत्ता ब्राह्मणांच्या हातात आहे. असल्या या राज्यात सर्वांचे कल्याण होईल, असे म्हणणे ही बाजारगप्प आहे. त्यांच्या हातून सर्वांचे कल्याण होणे