२३-४-१९३९ संस्थानांत राहणाऱ्या लोकांची स्थिती गोठ्यात कोंडलेल्या जनावरांपेक्षा वेगळी नाही - Page 305

संस्थानात राहाणाऱ्या लोकांची . . . . जनावरांपेक्षा वेगळी नाही २६७

अशक्य आहे. कारण जोपर्यंत या देशात गरीबांचे हितसंबंध हे श्रीमंत वर्गापासून भिन्न आहेत, एका वर्गाचे हितात दुसऱ्याचे अहित आहे व जेथे श्रीमंतांच्या

कल्याणाची कदर करण्यास आजची काँग्रेस सरकारे तत्पर आहेत अशा ठिकाणी या असल्या काँग्रेस सरकारांकरवी आमचे कल्याण होईल, असा आत्मविश्वास शेतकरी व मजूर या वर्गांनी बाळगिणे म्हणजे या वर्गाची अधोगती होय. आज ज्याठिकाणी क्रय-विक्रय वस्तूसारखी आपल्या मतांची विक्री, मतदार, श्रीमंत अशा लोकांना पैशाच्या लोभाला बळी पडून विकतात व त्याचा खरेदीकर्ता जथे श्रीमंत मारवाडी व गुजर आहे, अशा लोकांच्या हातात सत्ता दिली असता आपले नुकसान करून गोरगरीब जनतेचे हा वर्ग कल्याण करील हे कधीच संभवनीय नाही. असल्या लोकशांहीपेक्षा अनियंत्रित सत्ता हातात असलेला राजा परवडेल,

असे म्हणण्याची पाळी आता आली आहे. युरोपमध्ये ज्या प्रांतांची भरभराट चालली असे प्रांत म्हणजे जर्मनी, टर्की, इटली वगैरे होत. ' राजा कालस्य

कारणम्‌, या म्हणीप्रमाणे. देशाच्या भरभराटीस व उन्नतीस राजाच कारण

असतो. आज तरी जर्मनीचा हिटलर, टर्कीचा मुसोलिनी व इटलीचा ' केमालपाशा हे आपल्या देशाच्या प्रगतीला कारण आहेत. अशा राजांच्या हातात ` एकतंत्री सत्ता असता ते प्रजेचे जितके कल्याण करू शकतील तितके कल्याण ` मारवाडी अगर गुजर हे पैशाच्या जोरावर लोकांची मते विकत घेऊन लोकशाहीच्या

नावाखाली करू शकणार नाहीत.

येथील राजे फार सूज्ञ आहेत. त्यांना पेन्शन देऊन संस्थान खालसा

करण्यास ते हरकत घेतील, असे मला वाटत नाही. उलट माझी ही सूचना मान्य

करण्यास त्यांना अडचण भासणार नाही. या संस्थानची लोकसंख्या ५८,०००

असून वसूल मात्र अवघा साडेपाच लाख आहे. ज्या मुंबई प्रांताची लोकसंख्या

दोन कोटी व उत्पन्न साडेबारा कोटी आहे अशा प्रांतातसुद्धा शेकडा ७५ गावांना

अजून शाळा नाहीत. तेव्हा असल्या थोड्या उत्पन्नाच्या संस्थानाचा

ताबा ठेऊन काय गळफास घ्यावयाचा आहे ? या फलटण संस्थानात

साडेपाच लाखाने काही भागणार नाही. त्यांनी हा प्रांत ब्रिटिश मुलखास

जोडून घ्यावा.

या संस्थानातील अस्पृश्य मानलेल्या लोकांना आपली गाऱ्हाणी राजापुढे

मांडण्यास मोकळीक असावी. . प्रजेचे रक्षण करून त्यांच्या पोटापाण्याची

सोय करावी. ज्या लोकांना आपल्या अस्पृश्यतेमुळे कोणताही घंदा-

रोजगार करता येत नाही, ज्यांना स्पृश्य मानलेले लोक भांडी घासणे अगर