२६८ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
कपडे धुणे या कामासाठीसुद्धा जेथे ठेवित नाहीत असल्या प्रजेस आपल्या
राज्यात असलेल्या पडित जमीनी सरकारने त्यांना वहिवाटीस द्याव्यात.
शिक्षणासारख्या आवश्यक कामी लागणारा पैसा खर्च करण्यास या वर्गाजवळ काही नसल्याने सरकारने या वर्गाच्या लोकांना पाटी, पुस्तके, स्कॉलरशिपा वगैरे देऊन हातभार लावावा.
या संस्थानात असलेल्या कायदे मंडळात १९ माणसे आहेत. त्यात आमचा प्रतिनिधी अवश्य घ्यावा. पूर्वी कै. आयवळे नावाचे गृहस्थ कायदे मंडळात १९३३ पर्यंत होते. त्यांच्या निधनानंतर दुसरा का निवडू नये, समजत नाही. एकदा मिळालेला हक्क परत घेतला असल्यास तो अवश्य परत मागावा. तसेच म्युनिसीपालिट्या, जिल्हा बोर्ड वगैरे ठिकाणी आमचे वर्गाचे प्रतिनिधी घेण्यात
यावे.
शेवटी एक कटुसत्य तुम्हाला सांगितल्याशिवाय माझ्याच्याने राहवत नाही. आपल्या समाजात मृतमांसाहाराची अनिष्ट रूढी प्रचारात होती. ती रूढी आपल्या समाजाच्या अवनतीस कारण झाली आहे. ही अधम चाल आपण ताबडतोब बंद करावयास हवी आहे. ही घाण जोपर्यंत आपण काढून टाकीत | नाही तोपर्यंत समतेचा झगडा झगडण्यास आपण अपात्र ठरू. तरी ही रूढी अविलंब बंद करावी.
शेवटी सर्वांनी जमून त्यांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतल्याबद्दल सर्वाचे आभार मानून टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात ते खाली बसले. |
नंतर श्री. भाऊराव गायकवाड यांनी परिषदेपुढे मांडावयाचे एकंदर ५ ठराव | एकत्र मांडून त्यास इतर दोघांनी अनुमोदन दिल्यानंतर एकमताने पास करण्यात आले. |