१५८
इमारत फंडासाठी एक [महिन्याचा ] [पगार ] [द्या ] [! ]
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आज्ञेवरून श्री. शां. अ. उपशाम, सेक्रेटरी,
इमारत फंड मुंबई यांनी ता. १४ जून १९३९ रोजी मुंबईतील महार जातीतील प्रमुख गृहस्थांना उद्देशून एक निवेदन काढले होते. ते येणे प्रमाणे--
अनेक जोहार, वि. वि. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रस्थापित केलेल्या इमारत फंडाच्या कार्याला जोराची चालना देण्याच्या बाबतीत विचारविनिमय करण्यासाठी ता. १८ जून १९३९ रोजी सकाळी ९ वाजता ठिकाण आर. एम: भट हायस्कूल (मे. प्रि. दोंदे यांची शाळा) परळ, मुंबई येथे आपण आपल्या चाळीतील चार प्रमुख मंडळीसह येण्याची कूपा करावी, सदर प्रसंगी डॉ. बाबासाहेब
आंबेडकर हे स्वतः हजर राहाणार आहेत.
याप्रमाणे ता. १८ जून १९३९ रोजी सकाळी १० वाजता परळ, मुंबई येथील
आर. एम. भट हायस्कूल मधील हॉलमध्ये इमारत फडाच्या सभेस सुरुवात
झाली. मुंबई व मुंबई सबर्बन भागातील सर्व कार्यकर्त्यानी सबंध हॉल चिक्कार
भरला होता. |
प्रथमतः इमारत फंडाचे सेक्रेटरी श्री. शांताराम अनाजी उपशाम यांनी इमारत
फंडाच्या आतापर्यंत झालेल्या कार्याचा आढावा वाचून दाखविला. यानंतर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भाषण झाले. ते आपल्या भाषणात म्हणाले,
भगिनींनो व बंधूंनो,
अस्पृश्य समाजाकरिता सार्वजनिक कार्यासाठी मुंबईत एक प्रशस्त इमारत
बांधणे जरूर आहे, असे मी वर्ष सव्वा वर्षापूर्वी तुम्हाला सांगितले होते व त्यासाठी
महार जातीने विशेष पुढाकार घेऊन फंड जमा करावा असेही सांगितले
होते. त्या माझ्या सांगण्याप्रमाणे काही ठिकाणच्या लोकांनी फंड जमा करून
आतापर्यंत मजजवळ दोन अडीच हजार रुपये आणून दिले आहेत. मुंबई
सारख्या ठिकाणी आपल्या सार्वजनिक कार्याला पुरेशी पडेल अशी इमारत
बांधण्यास कमीत कमी एक लाख रुपये खर्च येणार आहे. एकदर परिस्थितीचा
विचार करता १-२ महिन्यातच या कार्याची मुहूर्तमेढ रोविली गेली पाहिजे. तेव्हा
तुम्ही यापुढे स्वस्थ न बसता आजपासून या कार्याला सुरवात करा. दरेक
चाळीतील माणसांनी आपल्यातील चार पाच किंवा चाळ मोठी असल्यास पाच
CE DN
440 23 न मोत्या रति पनितनिल्विततमालि
जनता : १७ आणि २४ जून १९३९.