आणि भाषणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन २७०
दहा योग्य माणसांची कमिटी नेमा व त्यांच्या माफत आपापल्या चाळीतील माणसांची खानेसुमारी काढा. कमिटीतील सभासदांची नावे १-२ दिवसात कळवा. खानेसुमारी कशी काढावी याबद्दल तुम्हाला स्वतंत्र मजूर पक्षाच्या ऑफिसमध्ये माहिती मिळेल. ८-१५ दिवसात तुम्ही आपापल्या चाळीतील खानेसुमारी काढून स्वतंत्र मजूर पक्षाच्या ऑफिसमध्ये श्री. उपशाम मास्तर यांच्याकडे आणून द्या. सदर माहिती आणून दिल्यानंतर वर्गणीची रक्कम कशी
जमा करावयाची याबद्दल तुम्हाला मागाहून माहिती देण्यात येईल.
या सत्कार्याला ज्यांचा पगार महिना ३० रु. पर्यंत आहे त्यांनी कमीत कमी
२ रु. व ज्यांचा पगार ५० रु. पर्यंत आहे त्यांनी ५ रु. व ५० रु. पेक्षा जास्त पगार
असणारांनी आपला एक महिन्याचा पगार द्यावा. तसेच शिक्षक, शिक्षकिणी व क्लाकच्या नोकरीवर असणाऱ्या लोकांनी आपला एक महिन्याचा पगार
द्यावयास पाहिजे.