१८-६-१९३९ इमारत फंडासाठी एक महिन्याचा पगार द्या ! - Page 309

१५९
अस्पृश्यांतील जातीभेद नष्ट व्हावेत
हा धर्मांतराचा एक [हेतू ]

` रोहिदास शिक्षक प्रसारक समाजाचे [विद्यमाने ] [चांभार ] [समाजाची ] [शिक्षक ] [परिषद ] रविवार २ जुलै १९३९ [रोजी ] [सायंकाळी ] [आर. ] [एम. ] [भट ] [हायस्कूलच्या ] [हॉलमध्ये ] प्रि. दोंदे यांचे अध्यक्षतेखाली [भरली ] [होती. ] त्यावेळी निमंत्रित [पाहुणे ] [म्हणून ] डॉ. बाबासाहेब आंबेडकर [यांचे ] [विचारपरिप्लुप्त ] [असे ] [भाषण ] [झाले. ] ते आपल्या

भाषणात म्हणाले, |

आजची सभा रोहिदास [समाजातील ] [निरनिराळया ] [परीक्षेत ] [उत्तीर्ण ] [झालेल्या ] विद्यार्थ्यांस बक्षिसे [वाटण्याकरिता ] [भरणार ] [आहे ] [अशी ] [माझी ] [समजूत ] [होती ] [आणि ] म्हणूनच मी सभेस [हजर ] [राहिलो. ] पण या सभेत तशा [प्रकारचा ] [समारभ ] [आहे ] असे दिसत नाही. तथापि; मी येथे हजर [आहे ] [म्हणून ] [दोन ] [शब्द ] [सांगावे ] [असा ]

आपला आग्रह आहे [म्हणून ] [मी ] [आपल्यापुढे ] [लहानसे ] [भाषण ] [करीत ] [आहे. ]

प्रथमतः मला [प्रामुख्याने ] [सांगावयाचे ] [म्हणजे ] [मी ] [कोणत्याच ] [विशिष्ट ] [जातीच्या ] चळवळीत भाग [घेत ] [नाही. ] मी सार्वजनिक [कामाला ] [आरंभ ] [केल्यापासून ]

जातीनिष्ठ मनोभूमिका [कधीच ] [ठेविली ] [नाही. ] मी महार म्हणून [जन्माला ] [आलो ]

असलो तरी महार [जात ] [टिकवावी ] [म्हणून ] [मी ] [प्रयत्न ] [करीत ] [नाही. ] मी

चालविलेल्या जनता [पत्रात ] [तशा ] [प्रकारची ] [मी ] [कधीही ] [शिकवण ] [दिली ] [नाही. ] मला

महार म्हणून काय [उज्ज्वल ] [स्मृती ] [कायम ] [ठेवावयाची ] [आहे ] [? ] [महारांनी ] [जातीबंधने ]

तोडून टाकावी म्हणूनच [मी ] [सदोदित ] [आटापिटा ] [करीत ] [असतो. ] मी आणि माझे

अनुयायी मांग, [भंगी, ] [चांभार ] [इत्यादी ] [भिन्नजातींशी ] [रोटी ] [व्यवहार ] [सर्रास ] [करतो ]

व जो जातीभेद [मानील ] [त्याचा ] [तीब्र ] [निषेध ] [करतो ] [व ] [इतर ] [जातींनीही ] [तोच ] [उपक्रम ]

करावा म्हणून हमखास [सांगत ] [असतो. ] भिन्न जातीत विवाह [व्हावे ] [म्हणून ] [आम्ही ]

सतत प्रचार करीत [असतो. ] पण विवाह ही [काही ] [जबरीने ] [घडवून ] [आणण्याची ]

बाब नसल्यामुळे [एखादी ] [महाराची ] [मुलगी ] [व ] [मांगाचा ] [किवा ] [चांभाराचा ] [अगर ] [भंग्याचा ]

मुलगा यांना [झाडाशी ] [बांधून ] [व ] [घागर ] [घागर ] [त्यांच्यावर ] [पाणी ] [ओतून ] [काही ] [त्यांचे ]

लग्न लावावयाचे [नाही. ] तथापि, जर [भिन्न ] [जातीतील ] [वधुवरे ] [स्वखुशीने ] [विवाह ]

लावीत असतील [तर ] [त्यास ] [मी ] [हरएक ] [प्रकारे ] [उत्तेजन ] [देईन ] [व ] [त्यांच्यावर ] [होणारा ]

सामाजिक [जुलूम ] [कमी ] [करण्याचा ] [प्रयत्न ] [करीन. ] हे झाले सामाजिक

बाबीसंबंधी. राजकीय बाबतीत [मी ] [स्वतंत्र ] [मजूर ] [पक्षाची ] [स्थापना ] [केली ]

जनता : ८ जुलै १९३९. `