१८-६-१९३९ इमारत फंडासाठी एक महिन्याचा पगार द्या ! - Page 310

आणि भाषणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन २७२

महारांची अधिक अधिक आहे. पण त्याचा दोष माझेकडे नाही. लोकसंख्याच असल्यामुळे ते अधिक जमावाने त्यात सामील झाले आहेत. मी काही चांभारांना

करीत नाही. तुम्ही माझे पक्षात या असे सांगत नाही किंवा आग्रह ज्याला पक्षाची तत्त्वे पसंत पडतील, ज्यांना त्याचा कार्यक्रम मान्य होईल ते आपोआप येतील अशी माझी खात्री आहे. चांभारांना जर असे वाटत असेल की आपण काँग्रेसमध्ये जावे तर त्यांनी खुशाल जावे. पण त्यांना एक गोष्ट मला सांगावीशी वाटते, ती ही की, त्यांना जी आज काँग्रेसमध्ये किंमत आहे ती जर आम्ही काँग्रेसमध्ये सामील झालो तर कायम राहिल का ? मी आज काँग्रेसच्या बाहेर आहे त्यामुळे त्यांना काँग्रेसवाले जवळ करीत आहेत. काँग्रेसवाले माझा द्वेष करतात म्हणून ते तुमच्यावर प्रेमाची साखर पेरतात. काँग्रेसमध्ये जाणे मला काही फार कठीण नाही. तसे जर मी केले तर आज जे तुम्ही सामील आहात त्यांची काय स्थिती होईल याचा त्यांनी विचार करावा. आमच्यापैकी एकाला दिवाणगिरी मिळाली असती. आज सोनगावकर किंवा तळकर काँग्रेसमध्ये सामील झाले असून देखील त्यांची काय स्थिती आहे ? हात वर करण्यापलिकडे

त्यांना काय किंमत आहे ?

काही चांभार लोक माझेवर आरोप करतात की महारांना अधिक प्रमाणात मी

मतदानाचा हक्क मिळवून दिला. कारण महार वतनदारांना मताचा अधिकार

मिळाला. पण मी या गोष्टी केल्या हे म्हणणे साफ चुकीचे आहे. या गोष्टी

प्रांतिक सरकारच्या मताप्रमाणे घडून आल्या आहेत. साधारण शेकडा किती टक्के लोकांना मतदानाचा हक्क द्यावयाचा हे सरकारने ठरविले व त्याप्रमाणे

निरनिराळ्या प्रांतिक सरकारांनी निरनिराळ्या पद्धती सुचविल्या व त्या सरकारनी अंमलात आणल्या त्यात माझा दोष नाही. पण या बाबतीत मला एक महत्त्वाची गोष्ट सांगावयाची आहे. मुंबई प्रांतात वरिष्ठ व कनिष्ठ अशी दोन कायदे मंडळे आहेत. वरिष्ठ कायदे मंडळाचे मुंबई शहरातील मतदार जवळ जवळ ३५० आहेत. त्यापैकी सुमारे ३०० मतदार चांभार आहेत आणि ५० महार

आहेत. म्हणजे महारांच्या निदान ६ पट मतदार चांभार आहेत. महारांची लोकसंख्या चांभारांच्या कितीतरी पटीने अधिक आहे. पण हा जो महारांवर अन्याय झाला याची जाणीव माझेवर स्वार्थाचा आरोप करणाऱ्या चांभार पुढाऱ्यांना का झाली नाही ? आम्हाला चांभारांना अधिक मतदार मिळाले म्हणून खंती वाटत नाही. पण खेद वाटतो तो सर्व चांभार समाजाने मनात आणले असते तर केवळ आपल्या मतांच्या जोरावर ते आपला एक प्रतिनिधी वरिष्ठ कायदे मंडळात निवडू शकले असते. पण ही साधी गोष्ट देखील ते करू शकले नाहीत. इतकेच नव्हे तर एक चांभार उमेदवार उभा राहिला होता त्याला विरोध करून काही चांभार

पुढाऱ्यांनी दुसऱ्या उमेदवाराला मते जमविण्याचा प्रयत्न केला. दुसरी गोष्ट