अरपृश्यांतील जातीभेद . . . . हा धर्मांतराचा एक हेतू २७३
अस्पृश्यांच्या चळवळीत महार समाजाने प्रामुख्याने भाग घेतला व कष्ट सोसले
ही गोष्ट निर्विवाद आहे. पण त्यामुळे त्यांनी सरकारी नोकऱ्या किंवा अधिकाराच्या जागा अधिक मिळविल्या असे काही झाले नाही. उलट चळवळे म्हणून सर्व जातीवर एक छाप बसला. मी पूर्वीच्या कायदे मंडळात असताना
१९२७ सालापासून नाशिक येथील पोलीस ट्रेनिंग कॉलेजात अस्पृश्यांचा प्रवेश व्हावा म्हणून कसोटीचा प्रयत्न केला व त्यात थोडेबहुत यशही आले पण त्यात. आतापर्यंत जे उमेदवार दाखल झाले त्यातून महार उमेदवारांना खड्यासारखे वगळण्यात आले. त्यांना अधिकाऱ्यांकडून प्रश्न विचारण्यात येतो की, तू किती विहिरी बाटविल्यास? तेव्हा चळवळीमुळे झाला असेल तर महारांचा तोटाच
झाला आहे पण मला त्याबद्दल वाईट वाटत नाही. महार चळवळ करतात ती ।
सर्व अस्पृश्य वर्गांच्या हिताकरता करतात. त्या चळवळीत त्यांचा तादृष्य असा
फायदा झाला नाही तरी तो समाज जागृत झाल्याशिवाय राहणार नाही व पुढे
गेल्याशिवाय राहाणार नाही. मागे राहातील ते चळवळ न करणारे लोक
राहतील. मी चांभार किंवा मांग यांना तुम्ही माझे मागे या असे बिलकूल सांगत
नाही. ज्यांना यायचे असेल त्यांनी यावे. कोणी माझे बरोबर राहिला किंवा
कोणी मला सोडून गेला तरी त्याबद्दल मला आनंद किंवा रोष वाटत
नाही. माझ्या तत्त्वावर, माझ्या कार्यक्रमावर माझा पूर्ण विश्वास आहे आणि माझी
खात्री आहे की जे लोक मला सोडून गेले ते देखील माझ्या कार्यक्रमामागे
येतील. शिवतरकर मास्तर देखील येतील! ते मला सोडून गेले म्हणून मला
त्याचेबद्दल रोष वाटत नाही किंवा त्यांचेबद्दल मी कोणाजवळ वाईट बोलत नाही. ते मला शिव्या देतात हे मला माहित आहे. पण मी असे म्हणतो की
शिवतरकर मास्तर माझे बरोबर १२ वर्षे काम करीत होते. एवढ्या दीर्घावधीत
माझ्यातील जे दोष त्यांना दिसले नाहीत ते १३ व्या वर्षीच कसे दिसले ?
१२ वर्षे मानवलेले माझे दोष त्यांच्या मते दोष तरी नसले पाहिजेत किंवा असलेच
तर ते क्षम्य असले पाहिजेत. तेव्हा माझा मार्ग सरळ आहे व सर्वाना खुला
आहे. मी धर्मांतराचे मत पसंत केले. त्यात आपल्यातील महार, मांग, चांभार
इत्यादी जातीभेद नष्ट व्हावेत हा एक हेतू आहे. आपण धर्म बदलला तर निदान
महार, मांग, चांभार ही नावे तरी आपणास चिकटणार नाहीत. आपण सर्व एक
होऊ व उन्नतीच्या मार्गाला लागू शेवटी तुम्हास मला इषारा द्यावयाचा आहे
आणि तेच माझे महत्त्वाचे कर्तव्य आहे असे मी समजतो. कांग्रेस ही हिदू
लोकांची आहे. तिचे अग्रणी गांधी हे तुम्हाला फसवीत आहेत. ' हरिजन
सेवक संघ ' हा तुम्हाला गुलाम करण्याचा कावा आहे. त्यापासून तुम्ही सावध
रहा व डोळे उघडून वागा. इतके बोलून मी आपली रजा घेतो.
७ ७ ७
वि (वाय) ४१०-२० `