१६०
करवाढीच्या तुटीवर हक्क कोणाचा ?
बुधवार ता. १२ जुलै १९३९ रोजी सायंकाळी मुंबईतील सर कावसजी हॉलमध्ये| काँग्रेस सरकारच्या करवाढीच्या धोरणास विरोध करण्यासाठी भरलेल्या सभेत| डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुद्देसूद भाषण झाले.
डॉक्टरसाहेब म्हणाले,
सरकारने बसविलेले नवे कर अभूतपूर्व आहेत. अण्णासाहेब लड़े मुंबई| सरकारचे मंत्री, यांनी दिलेल्या आकड्यांवरून हिंदुस्थानातील निरनिराळ्या प्रांतात करभाराचे प्रमाण काय आहे हे दिसून येते. ` बिहारमध्ये दर माणसी || रु. १-४-०, बंगालमध्ये रु. १-१२-०, आसाममध्ये रु. २-४-०, मध्यप्रांत रु. २-१२-०, | संयुक्तप्रांत रु. २-४-०, पंजाबमध्ये रु. ४-८-०, मद्रासमध्ये रु. ३-४-०, सिधमध्ये | रु, ४ व मुंबईमध्ये रु. ६ या प्रमाणात करभार द्यावा लागतो. वरील आकड्यांवरून मुंबई प्रांतात करभार कसा डोईजड आहे हे उघड दिसून येते.
|
। ही झाली प्रांतवार रड. पण चालू करवाढ फक्त मुंबई शहर व उपनगर यावरच लादण्यात आली आहे. मुंबई शहरात आजवर कराचे ओझे दरमाणसी | रु. २५ असे. नव्या कर लादणीने ते ओझे रु. ४५ पर्यंत वाढणार आहे. करवाढीच्या प्रयोगात ही गोष्ट अभूतपूर्व आहे. सन १९१९. पासून आजवर मुंबई प्रांतात शिक्षण मोफत व सक्तीचे करण्यासाठी चळवळ चालू आहे. या प्रांतात २४,७९,००० मुले शाळेत जाण्याच्या वयात आहेत. या मुलांच्या संख्येत ६ ते ११ वयाच्या मुलांचाच फक्त अंतर्भाव करण्यात आला आहे. या २४ लाखांवर मुलांपैकी फक्त साडेसात लाख मुलेच काय ती शाळेत दाखल झालेली आहेत. मुंबई प्रांतात २४००० वर खेडी असून त्यापैकी ८००० खेड्यातूनच शाळा अंस्तित्वात आहेत. वरील आकड्यांवरुन मुंबई प्रांतात १७,००,००० मुलांचा अज्ञानात कोंडमारा होत असून १६००० खेडी अज्ञानांधकारातच गडप झालेली आहेत हे दिसून येईल. या १७,००,०००, मुलांचा कोंडमारा चालू | ठेवावयाचा की काय असा प्रश्न साहजिकच उपस्थित होतो. सरकारने या निरपराध मुलांचा विचार करावयास नको काय ?
जनता : १५ जुलै १९३९.