१२-७-१९३९ करवाढीच्या तुटीवर हक्क कोणाचा ? - Page 314

२७६ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

पण दारू पिऊन बेहोष होणाराचे काय ? दारू पिणे हाच कायद्याने ठरवावयास हवे होते पण तसे करण्यात आले नाही. दारूबंदी यशस्वी होणार नाही असे मला वाटते व दारूबंदीसाठी दीड दोन कोटी रुपये फुकट जाणार आहेत. गांधीबुवांना दुखविण्याचे धैर्य नसलेले मंत्री मुंबईला लाभले हे मुंबईतील लोकांचे दुर्दैव होय. नाहीतर मुंबईच्या मंत्र्यांना मद्रासचे राजगोपाळचारी यांचा धडा घेऊन गांधीबुवांना धाब्यावर बसवता आले असते यात संशय नाही.