१६१
स्वातंत्र्याचा [अर्थ ] [उच्चवर्णीयांना ] [स्वातंत्र्य ] [व ]
आमच्यावर अधिराज्य [असा ] [कधीच ] [होऊ ] [शकत ] [नाही ]
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महायुद्धाशी संबंधीत ठरावावरील चर्चेत
सहभागी होताना ता. २६ ऑक्टोबर १९३९ रोजी विधीमंडळात भाषण झाले.
स्वतंत्र मजूर पक्षाचे पुढारी डॉ. भीमराव आंबेडकर टाळ्यांच्या गजरात भाषण करावयाला उभे राहिले. प्रथम त्यांनी अध्यक्षांना जास्त वेळ देण्याची विनंती केली व ययातीला त्याचा मुलगा कुरुरव याने आपले आयुष्य दिले त्याप्रमाणे आपल्या पक्षातील सभासदांनी जास्त वेळ मिळावा म्हणून त्यांना एकट्याला भाषणा करण्याची परवानगी दिल्याचे सांगितले. महाभारतातील दृष्टांताने डॉ. बाबासाहेब यांनी भाषणाला सुरुवात केली व सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे अभिनंदन
केले.
ते म्हणाले,
हा ठराव अप्रस्तुत आहे असे मला वाटते. ज्या राष्ट्रीय मागण्यांचा या ठरावात
उल्लेख केला आहे, त्या मागण्या या असेंब्लीत ना. मुख्य प्रधानांनी मांडल्या
नव्हत्या. त्या मागण्या त्यांच्या हायकमांडने सादर केल्या. हायकमांडला
कायद्यामध्ये अस्तिव नाही, काँग्रेस मंत्रिमंडळाच्या बर्या वाईट कृत्यावर
देखरेख ठेवणारी ती समिती (व्हिजिलन्स कमिटी) आहे. आता त्या मागण्या
सरकारने नाकारल्या म्हणून ना. खेर, सर्व डाव फिसकटला, धावा हो धावा,
आम्हाला मदत करा, अशा रीतीने हा ठराव मांडीत आहेत. हा या असेंब्लीचा
मोठा अपमान आहे.
ना. व्हाईसरॉय यांचे पत्रक ता. १८ रोजी प्रसिद्ध झाले, त्याला आज ७ दिवस
झाले. त्या पत्रकाविषयी मत व्यक्त करण्याकरिता हा ठराव नाही. तो क्षुल्लक
व उथळ आहे. मला यावर बरेच बोलता येईल. प्रतिस्पर्ध्यावर टीका
करण्याची प्रत्येकाला संधी मिळते. पण ना. खेर यांनी मतभेद विसरून जा अशी
विनंती केली आहे. म्हणून या ठरावाशी कोणत्या बाबीपुरते माझे सहमत आहे
ते मी प्रथमतः सांगतो. हिंदी लोकांच्या इच्छेविरुद्ध त्यांना या युद्धात पडावे
लागले यात शंका नाही. आमचे परराष्ट्रीय धोरण ब्रिटिश साम्राज्याच्या गाड्याला जोडले आहे. वसाहती इतकाही आल य जोडले आहे. वसाहती इतकाही आम्हाला दर्जा नाही.
जनता : २८ ऑक्टोबर १९३९.