स्वातंत्र्याचा अर्थ उच्चवर्णीयांना स्वातंत्र्य . . . शकत नाही २७९
ही सर्व उदाहरणे निवेदन केल्यावर ते पुढे म्हणाले, ना. मुन्शी यांच्या उपसूचनेत संरक्षणाचे तत्त्व मान्य करण्यात आले आहे. पण ते संरक्षण अस्पृश्यांच्या अधिकृत प्रतिनिधींना समाधानकारक असे पाहिजे. गृहमंत्री आपण अल्पसंख्यांकांचे ट्रस्टी आहोत असे समजतात. आमचे ट्रस्टी व संरक्षक दुसरे कोणी नाही. म्हणून त्यांची उपसूचना मला मान्य करता येत नाही. दुसऱ्या उपसूचनेत ना. मुन्शीनी आमचे अर्धे म्हणणे मान्य केले आहे. सध्याची
राज्यव्यवस्था आर्याच्या चातुर्वर्ण्यासारखी आहे. क्षत्रियांनी राज्य करावे,
ब्राह्मणांनी ज्ञानदान करावे, वैश्यांनी व्यापार करावा व शुद्र आणि अतिशुद्रांनी सेवा
करावी अशी ती तत्त्वे होती. वैश्यांनी आता राजकारणाचाही व्यापार सुरु केला आहे. (हंशा) पण शुद्रांच्या दर्जात फरक झालेला नाही. या अन्यायाविरुद्ध
माझे रक्त उसळते. सामाजिक, आर्थिक व धार्मिक वर्चस्वाच्या जोडीला
राजकीय वर्चस्व घालण्याला मी माझ्या रक्ताच्या शेवटच्या थेंबाने विरोध करीन,
(टाळ्या) स्वातंत्र्याचा अर्थ उच्चवर्णीयांना स्वातंत्र्य व आमच्यावर अधिराज्य असा ` कधीच होऊ शकत नाही.
आयर्लंडमध्ये अल्स्टर प्रांतीय लोकांनी संरक्षण नको पण स्वातंत्र्य पाहिजे असा
आग्रह धरल्याचा दाखला देऊन डॉ. आंबेडकर म्हणाले, मी ते मागत नाही.
आम्हाला योग्य ती संरक्षणे द्या इतकीच आमची मागणी आहे. वैयक्तिक
स्वार्थापिक्षा देश मोठा आहे. स्वार्थाची मी कास धरली असती तर निराळ्या
ठिकाणी मी आज असतो. मला दोन गोष्टी पूज्य आहेत. एक देश व ज्या
जातीत जन्मलो व वाढलो ती अस्पृश्य जात ह्या त्या होत. माझ्या जमातीकरिता
मी इतर सर्वाचा त्याग करावयाला तयार आहे.
नंतर मुस्लिम लीग लोकशाहीच्या तत्त्वाविरूद्ध असली तरी स्वायत्ततेच्या विरूद्ध
नाही असे त्यांनी स्पष्टीकरण केले. लोकशाही, राजसत्ता है सर्व घटनेचे प्रकार ` आहेत, स्वायत्तता हे मुख्य तत्त्व आहे असे ते म्हणाले.
शेवटी त्यांनी सांगितले की, ना. मुख्य प्रधान उत्तम मुत्सद्दी आहेत. पण
मंत्रिमंडळाने राजीनामा देण्याला ते कायदेमंडळाची संमती का मागतात तेच मला
कळत नाही. तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. राजीनामा देण्याला जर त्यांना
माझी परवानगी पाहिजे. तर मी बोलाविल्याशिवाय यावयाचे नाही अशी अट ते कबूल करावयाला तयार आहेत काय £