१६२
न्याय्य हक्काआड सरकार आले तर बंड करा
पण अन्याय सहन करू नका
मुंबई इलाखा वतनदार महार, मांग, वेठिया परिषदेविषयी पत्रक काढण्यात आले. ते येणेप्रमाणे,--
*“ ता. १६ शनिवार व १७ रविवार, डिसेंबर १९३९ जागा-हरेगाव, शुगर फॅक्टरी, ता. कोपरगाव, जि. अहमदनगर, अध्यक्ष-डॉ. बाबासाहेब आंबेडकर.
सर्व वतनदार महार, मांग, वेठिया वगैरे बंधु-भगिनींना विनंतीपूर्वक कळविण्यात येते की, वतनाबद्दल आपणास वाटत असलेला अभिमान व लोभ विचारात घेऊन सरकार वतनदार महार, मांग, वेठिया वगैरे लोकांवर वेळोवेळी अन्यायी व जुलमी | बंधने लादीत आहे. गावकामगार महार वगैरे लोक इमाने इतबारे सर्व सरकारी कामे करीत असूनही पाटील, तलाठी वगैरे लोकांच्या खोडसाळ रिपोर्टावरून| शेकडो महारांना सरकारी कामे करीत नाहीत म्हणून दंड करण्यात येत| आहे. तर गावकामगार महारांकडून पूर्वी जी सरकारी कामे करवून घेतली जात। असत ती सर्व सरकारी कामे गावकामगार महार वगैरे लोकांकडून करवून घेऊन दारिठ्र्याने गांजलेल्या व असलेली जुडीपट्टी मोठ्या कष्टाने भरणाऱ्या महार वगैरे लोकांच्या इनाम जमिनीवर हजारो रुपयांनी जादा जुडी वाढवून त्यांना अधिक कंगाल करण्यात येत आहे. तसेच त्यांनी सरकारी म्हणून करावयाच्या | कामाचे भलतेच लटांबर त्यांच्यामागे लावून त्यांना जर्जर करून सोडले आहे.
या सर्व जुलूमांचा आपण वेळीच विचार करून आपले रास्त मागणे सामुदायिकरित्या मागावयास हवे आहे. आपल्या रास्त मागण्यांचा जर सरकारनी विचार केला नाही तर आपल्यावर होणाऱ्या या जुलूमांचा सनदशीर मार्गानी प्रतिकार केला पाहिजे. या सर्व महत्त्वाच्या व आपल्या जिव्हाळ्याच्या बाबींचा विचार परिषदेत होणार असल्याने आपण सर्वानी या प्रसंगी येण्याची कृपा करावी.
अनेक अडचणींमुळे परिषदेसाठी येणाऱ्या पाहुण्यांची जेवणाची व्यवस्था व्यवस्थापक मंडळास करता येणे शक्य नाही. हे कळविण्यास अत्यंत वाईट वाटते. यासाठी सर्वांनी आपापल्या पुरत्या भाकरी बरोबर आणाव्यात अशी नम्र विनंती आहे.
जनता : ९ डिसेंबर आणि २३ डिसेंबर १९३९.