न्याय्य हक्का आड सरकार आले तर . . . . . सहन करू नका २८१
या परिषदेबाबत कोणास काही पत्रव्यवहार करणे असल्यास तो त्यांनी क्वै, भाऊराव कृष्णराव गायकवाड, एम. एल. ए., नाशिक, यांच्या पत्त्यावर
करावा.”
४ याप्रमाणे आयोजित मुंबई इलाखा महार, मांग, वेठिया, वतनदार परिषदेत क्ष्ध्यक्ष या नात्याने डॉ. बाबासाहेब -आंबेडकरांचे अत्यंत उद्बोधक, तडफदार $ कळकळीचे भाषण दिनांक १६ डिसेंबर १९३९ रोजी हरेगाव, येथे झाले.
८ डॉ. बाबासाहेब आपल्या भाषणात म्हणाले,
# आजची परिषद महार, मांग व वेठिया यांच्या वतनाचा विचार करण्यासाठी ह्ैलावण्यात आली आहे. ही परिषद का बोलाविण्यात आली याचे सविस्तर विवेचन या परिषदेचे स्वागताध्यक्ष, माझे मित्र श्री. भाऊराव गायकवाड यांनी हलेले आहेच. तरी त्यांच्या भाषणास धरूनच माझे भाषण असल्यामुळे
प्रथमत: श्री. भाऊरावांच्या भाषणातील मुख्य मुद्दे मी आपणास पुन्हा सांगत
आहे. त्यांनी मुख्यतः महार, मांग, वेठिया वतनदारांची चार तऱ्हेची गाऱ्हाणी
औपल्यापुढे मांडली आहेत. या वतनदारांचे पहिले गाऱ्हाणे म्हणजे सरकारने
अन्यायाने सुरू केलेली 'जुडीवाढ' हे होय. त्यांना मोबदला न देता त्यांच्या
क्षमिनीही जप्त करण्यात आल्या आहेत. जप्त केलेल्या जमिनींच्या किंमतीवरील
ब्याज त्यांना देणेही सरकारने आता बंद केले आहे.
' या वतनदारीने त्यांच्यावर लादलेल्या कामाबद्दल मिळणारा मोबदला अपुरा
कसून त्यांना जी नगद रक्कम देण्यात येते ती सुद्धा अलीकडे बंद करून त्याजवर
भ्राणखी एक अन्यायाचे ओझे लादण्यात आले आहे. अशारीतीने या दारिद्र्यात
शितपत पडलेल्या लोकांची चारही बाजूने पिळवणूक करण्यात येत असून त्यांच्या
द्वारिक्र्यात भर टाकण्यात आली आहे.
› काँग्रेस मंत्रिमंडळाने या वतनदारांनी करावयाची १९ कामे नमूद करणारा एक
ज्ञाहीरनामा नुकताच प्रसिद्ध केला आहे. या जाहीरनाम्यात जी कामे नमूद केली
आहेत त्यापैकी काही कामे जबरदस्त असून ती या गावकामगारास करणे अशक्य
श्राह. | ॥
» ही झाली वतनदार कामगारांची रडकथा. याशिवाय खेडोपाडी असे अनेक
छवकामगार आहेत की, त्यांना सरकारी कामे करावी लागतात. पण त्यांना
क्रमीनी मात्र दिलेल्या नाहीत व सरकारी पगारही नाही. गावात भीक मागून
ह्यांना आपली गुजराण करावी लागते. मरमर मरेपर्यंत त्यांना सरकारी कामे
करावी लागतात. या इमानदार नोकरास पगारपाण्याशिवाय तडफडत जीवन
कृठणे सरकार भाग पाडीत आहे, हा केवढा अत्याचार
५ आता जुडीवाढीच्या वतनदारांच्या या पहिल्या गाऱ्हाण्याकडे आपण वळू
बै या गाऱ्हाण्याचे स्वरूप कळण्यासाठी ' जुडी ' हे काय प्रकरण आहे ते
| प्रथमतः पाहिले पाहिजे. सरकारी नोकरांना वतनी जमीनी देण्याची