१६-१२-१९३९ न्याय्यहक्काआड सरकार आले तर बंड करा, पण अन्याय सहन करू नका ! - Page 324

आणि भाषणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन २८६

कमिटी नेमून कामास या अन्यायाची दाद लाऊन घेण्यासाठी आपण एक

करु या. आपण सरकारकडे अर्ज करू, डेप्युटेशन नेवू. सर्व काही

कायदेशीर रीतीने करू. एवढ्यावरच काम भागेल अशी मला आशा आहे.

नच झाले तर काय करायचे हेही आपण ठरवू. शेवटी माझ्या वतन बिलाचे काय

झाले ते सांगून मी आपले भाषण संपविणार आहे.

काँग्रेस सरकार सुरू होण्यापूर्वी जे तात्पुरते कूपर मंत्रीमंडळ अस्तित्त्वात आले|

होते त्यावेळी दिवाण पद स्वीकारण्याचे मी नाकारल्यामुळे थोड्या काळपर्यंत |

काँग्रेस सभांमध्ये माझा भाव थोडासा वधारला होता.*

काँग्रेस राज्य सुरू झाल्यावर माझ्या वतन बिलास त्यांनी पुष्टी देण्याचे

आश्वासन दिले होते. पण कालांतराने काँग्रेसचे पारडे फिरले. हे पारडे

फिरले तरी मला त्याची पर्वा नाही. माझ्या हातात अजून काही बाण शिल्लक ह

आहेतच. पुणे करारापूर्वी गांधींनी उपवास केला. त्यानंतर त्यांचा व काँग्रेसचा ह

हृदयपालट होईल, अशी मला आशा होती. आम्ही एकमेकांचे सहकारी होऊन

कार्य करू अशी मला उमेद होती. पण शेवटी चोरांशी सहकार्य अशक्य असाच

अनुभव आला. काँग्रेसला आज पूर्ण स्वातंत्र्य हवे आहे. हे स्वातंत्र्य देण्यापूर्वी

आमच्याही काही अटी पूर्ण झाल्या पाहिजेत. दुसऱ्यास एक भाकर देण्यापूर्वी |

आम्हास चतकोर तरी मिळालीच पाहिजे. आम्हास उपाशी ठेवून कोणी मेजवान्या झोडू लागल्यास त्यांच्या अन्नात माती कालविल्याविना आम्ही राहणार हू नाही. या आणीबाणीच्या प्रसंगी. तुम्ही सर्वानी एकजुटीने व निकराने वागले पाहिजे हे मात्र विसरू नका. |

७ ७ ७; |

|

* "स्वतंत्र मजूर पक्ष अशा मताचा होता की, भारताचे नवे संविधान, ते म्हणजे, भारत शासन | अधिनियम, हे दोषपूर्ण होते आणि पूर्ण जबाबदार शासनासाठी ते तोकडे पडत होते. काँग्रेस ह पक्षाचेसुद्वा या संविधानाने समाधान झाले नव्हते आणि ते मोडून टाकण्याचा त्यांचा निर्धार ह होता. पहिल्यांदा त्यांनी कार्यालय स्वीकारले नाही, परंतु मागाहून जुलै, १९३७ मध्ये त्यांनी | शासन बनविले तेव्हा सर धनजी शहा कूपर इतर मंत्र्यांसह मुख्यमंत्री झाले आणि ते लोक $ काही काळ शासन चालवित होते. सर धनजी शहांनी डॉ. आंबेडकर यांना आमंत्रण दिले | होते, पण ते त्यांनी नाकारले, कारण ते अशा मताचे होते की सर धनजी शहाच्या शासनाला $ बहुसंख्यांकांचा पाठिंबा नव्हता आणि म्हणून ते विधिग्राह्य शासन नव्हते. आमच्या पक्षाने ह म्हणून शासनामध्ये प्रवेश केला नाही."--न्या. आर. आर. भोळे यांचा “स्वतंत्र मजूर पक्ष आणि शै मुंबई विधानसभा” या शिर्षकाखालील लेख-डॉ. बाबासाहेब आंबेडकर गौरवग्रंथ-महाराष्ट्र ङ्ग राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ,मुंबई. पृष्ठ १३६-३७.