| १६३
तरुणांनो, निर्भय व्हा : स्वाभिमान जपा
ता. २४ डिसेंबर १९३९ रोजी दुपारी सातारा जिल्हा अस्पृश्य युवक परिषद
| येथे भरली होती. परिषदेचे अध्यक्षस्थान डॉ. बाबासाहेब आंबेडकर
यांनी सुशोभित करण्याचे कबूल केले होते. सभेस अलोट जनसमुदाय हजर होता. अंकलखोप येथे जात असता वाटेत भिलवडी गावी डाँक्टरसाहेबास स्थानिक स्त्रियांनी ओवाळून त्यांच्याबद्दल आपल्या ठायी वसत असलेली अलोट भक्ती व्यक्त केली. स्वागत मंडळाचे अध्यक्ष मि. पी. टी. मधाळे व इतर सभासद बांनी टोलेजंग मिरवणूक काढून डॉ.साहेबांसह परिषदेच्या मंडपात प्रवेश केला. डाँक्टरसाहेबाँचे प्रचंड टाळ्यांच्या गजरात, सभाजनांनी स्वागत
कैले.
परिषदेचे स्वागताध्यक्ष श्री. मधाळे यांनी स्वागतपर भाषण केले, त्यात ते म्हणाले, आपणा अस्पृश्यांवर डॉ. बाबासाहेबांचे परमेश्वरापेक्षाही जास्त उपकार झालेले आहेत. सज्जनांचे संरक्षण करून दुर्जनांचे संहारण करण्यासाठी परमेश्वराने दहा अवतार घेतल्याची. दंतकथा हिंदू धर्मात आहे. पण या दहा अवतारातील एका अवतारालाही आपणा अस्पृश्यांची व त्यांच्यावरील जुलूमांची आठवण झाली नाही. आजकाल आपणास हरिजन म्हणून गोंजारणाऱ्या महात्म्यांनीही आपल्या स्वाभिमानास पोषक असे कार्य मुळीच
केलेले नाही.
| स्वागताध्यक्षांच्या भाषणानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अध्यक्षीय भाषण | झाले, ते आपल्या भाषणात म्हणाले,
'मगिनींनो, तरूण मित्र व बंधुजनहो,
` आजची सभा प्रामुख्येकरून तरुणांची आहे. माझे मित्र श्री. मधाळे, आजच्या सभेचे स्वागताध्यक्ष हे तरुणच आहेत. या सभेत तरुंणांपुरतेच भाषण होईल अशी आपली अपेक्षा असणार. पण सभेस तरुणांप्रमाणेच तरुणात न मोडणारे इतर लोकही हजर असल्याने त्यांना आपल्या समाजाच्या जिव्हाळ्याच्या निरनिराळ्या प्रश्नांसंबंधी मी बोलावे असे वाटत असणारच. म्हणून प्रथमतः या
, जनता : ६ जानेवारी १९४०.