१६-१२-१९३९ न्याय्यहक्काआड सरकार आले तर बंड करा, पण अन्याय सहन करू नका ! - Page 326

डॉ. बावासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे २८८

प्रश्नांकडे वळतो' (येथे डॉ. साहेबांनी लोकांना दोन शब्द सांगून नंतर मी तरुणांच्या

करून सभेत मांडिलेल्या प्रश्नांची चर्चा हरेगावच्या महार वतनदार कामगारांच्या

| दिले.) ते प्रश्न सभाजनास समजावून

'जनता' पत्रातून माझे विचार दर नंतर तरुणांस उद्देशून ते म्हणाले,

आठवड्यास प्रसिद्ध होत असतात. ते पत्र वाचल्याने आपणास आपल्या

जिव्हाळ्याच्या प्रश्नांची माहिती होत जाईले.

आपणास स्वाभिमानाची अत्यंत जरूरी आहे. स्वाभिमान सोडून साधलेली उन्नती ही कुचकामाची आहे. इतरांप्रमाणेच आपणही माणसेच आहोत ही गोष्ट

प्रत्येक तरुणाने आपल्या मनात वागविली पाहिजे.

महारांनी महारवाड्यातच राहिले पाहिजे हे परमेश्वरास कधीही मान्य होणार

नाही. हजारो वर्षे चालू असलेल्या जुलूम जबरदस्तीने आपल्या समाजाच्या भावना मारल्या गेल्या आहेत. ब्राह्मणी राज्यात आपण स्वाभिमानाने वागतो तर

' पाह्यरी सोडल्याचा ' आरोप ठेवून आपणास हत्तीच्या पायीही देण्यात आले

असते.

आपण उन्नतीचा मार्ग आखला पाहिजे. अशिव व अमंगल अशा आपणातील | चाली आपण सोडून दिल्या पाहिजेत. ' पडे खावयाचे व तुकडे मोडावयाचे ' |

दिवस आता उरले नाहीत. आपल्या लोकांना इतर लोकांप्रमाणेच समाजातील

अधिकाराच्या जागा मिळाल्या पाहिजेत. पोलिसात आपल्या लोकांची आता

कोठे थोडी थोडी भरती होऊ लागली आहे. अजून पोलीस खात्यात

अधिकाराच्या जागा आपल्या सुशिक्षित तरुणांसही मिळत नाहीत ही शोचनीय

गोष्ट आहे. अस्पृश्य अधिकारी नेमला तर त्याच्या हाताखालील स्पृश्य

नाराज होणार ही भीती सरकारची अजून सुटत नाही, हे देशाचे दुर्दैव

नाही काय ?

आपण लोकांनी आपल्या अंगी निर्भयता बाणविली पाहिजे. आपल्या समाजास मानसन्मानाने जगात राहावयाचे असल्यास आपण सदैव मरावयास तयार असले पाहिजे. अशी आपली वृत्ती झाली की आपला अपमान करण्यास कोणीही धजणार नाही ' निर्भय व्हा व जगाचे राज्य मिळवा ' हेच माझे तुम्हा तरुणास सांगणे आहे.