२४-१२-१९३९ तरुणांनो, निर्भय व्हा : स्वाभिमान जपा - Page 327

तरुणांनो, निर्भय व्हा : स्वाभिमान जपा २८९

आता आपल्या राजकारणाबाबत मी आपणास दोन शब्द सांगतो. आपणात झालेल्या जागृतीबद्दल मी आपले अभिनंदन करतो. हिंदुस्थानात आपल्या ` राजकारणाचा मामला पुन्हा सुरू होणार असा रंग दिसू लागला आहे. काँग्रेस पक्ष व अस्पृश्य यामधील मतभेदांची सामदामाने तडजोड होईल असे वाटत नाही.

आपणास मिळालेले राजकीय हक्क पुरेसे नाहीत. काँग्रेस राजवटीतही आपल्या हक्कांचे संरक्षण होत नाही. काँग्रेसला अधिकार अधिक मिळाले की, आपल्यावरील जुलूमाचेही प्रमाण अधिक होते.

आपआपल्या पुरतेच पाहात राहणे हा अल्पसंख्यांकांचा दोष आहे. आपण ` ब्राह्मणेतर पक्षाचे उदाहरण घेऊ या. जे ब्राह्मणेतर काँग्रेसमध्ये सामील झाले त्यांनी काय मिळविले असा माझा प्रश्‍न आहे. पुढील आकड्यांवरून ब्राह्मणेतरांनी

काँग्रेसच्या कच्छपी लागणे ही भुरळ आहे, हे आपल्या निदर्शनास येईल. ब्राह्मणेतर

पक्षाची लोकसंख्या ७५ टक्के असून इतर सर्व पक्षांची लोकसंख्या फारतर २५ टक्के

भरेल.

मुंबईच्या कायदेमंडळात २७ ब्राह्मण सभासद आहेत, मंत्रीमंडळात तीन ब्राह्मण

मंत्री आहेत. प्रांतातील ७५ टक्के ब्राह्मणेतरांचा या मंत्रीमंडळात एकच

दृष्टमणि आहे. यावरून काँग्रेसला मिळालेल्या ब्राह्मणेतरांना काय लाभले

हे स्पष्ट होते.

रेव्हेन्यू खात्यातही हीच रड आहे. इलाख्याच्या उत्तर भागात चोवीस

मामलतदारांपैकी दहा मामलतदार ब्राह्मण आहेत व इतरही भागातून अशीच

विषमता नांदत आहे. यावरून हिन्दी राज्य कारभाराला, मग तो इंग्रज चालवीत

असो की, काँग्रेस चालवीत असो, ब्राह्मणबाधा झालेली आहे, हे उघड

होते. ब्राह्मण्य हे महाभयंकर विष आहे. ते हलाहलापेक्षाही भयंकर असल्याने

शंकरास देखील पचविता येणार नाही. या विषाला उतारा देण्यासाठी भगवान

बुद्धाने अवतार घेतला व ब्राह्मण्यावर हल्ला केला. आजचे काँग्रेसवाले

ब्राह्मणेतरास चकविण्यासाठी ररे मार्केटाचे' ' फुले मार्केट ' बनवितात. तद्वतच,

बुद्धकालीन ब्राह्मणांनी इंद्र, अग्नी, वरूण ' वगैरे आपल्या वैदिक देवता झुगारुन

त्यांच्या जागी ' राम, कृष्णादी 'क्षत्रिय देवांची स्थापना केली व आपल्या काळाच्या

ब्राह्मण्य विरोधकास चकवून आपले आसन स्थिर केले. असो पुढील

निवडणुकीत या भागातून आपला एक प्रतिनिधी निवडून द्या व राजकीय सत्ता

हस्तगत करण्याच्या मार्गास लागा. दारिद्र्यामुळे आपल्या विद्यार्थ्याना अनेक

अडचणीस तोंड द्यावे लागत असते. या अडचणीत सापडलेल्या विद्यार्थ्यांना

वि (वाय) ४१०-२१