२४-१२-१९३९ तरुणांनो, निर्भय व्हा : स्वाभिमान जपा - Page 328

२९० डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

भुलवून स्वाभिमानशून्य बनविण्यासाठी श्री. भाऊराव पाटील व हरिजन सेवासंघ यांनी ठिकठिकाणी सापळे निर्माण केले आहेत. भीष्माचार्यासारख्या वीराला कौरवांचे अन्न खाल्ल्याने पांडवांची न्याय्य बाजू घेता आली नाही, ही गोष्ट ध्यानात धरा व ' अर्थस्य पुरुषोदास: ' अशी आपली स्थिती करून घेऊ नका. आपल्या लोकांनी चालविलेल्या बोर्डिगासच मदत करून त्याचा फायदा घ्या. सातारा जिल्ह्यात माझे मित्र रा. सावंत यांनी एक बोर्डिंग उघडलेले आहे. या संस्थेस आपल्या लोकांनी भरपूर मदत करावी व तिचा फायदा गरीब विद्यार्थ्यास करून क्यावा अशी माझी आपणास आग्रहाची विनंती आहे.