२४-१२-१९३९ तरुणांनो, निर्भय व्हा : स्वाभिमान जपा - Page 329

१६४
सर्व मागासवर्गीयांनी एकजुटीने वागावे

ता. २५ डिसेंबर १९३९ रोजी बेळगाव येथे मुस्लिम लीग तर्फे बॅ. जीना यांची

जयंती साजरी करण्यात आली. सदर प्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनाही

आमंत्रित करण्यात आले होते. जयंतीनिमित्त झालेल्या सभेचे अध्यक्षस्थान

बेळगाव येथील मौलाना कुतुबुद्दीन अहेमद यांनी मंडित [केले ] [होते. ] [सभेस ] [तीन ]

हजारावर. लोक समुदाय जमलेला [होता. ]

अध्यक्षांनी डॉ. बाबासाहेब यांना भाषण करण्यास विनंती केल्यावरून बाबासाहेब

टाळ्यांच्या गजरात भाषण करण्यास उभे राहिले. ते म्हणाले,

अध्यक्ष महाराज व मुसलमान बंधुंनो,

या ठिकाणी भाषण करावे लागणार नाही असे मला वाटत होते. परंतु

सभाध्यक्षांनी मला बोलण्याची विनंती केली आहे तिचा अव्हेर करून त्यांची निराशा

करणे मला योग्य वाटत नाही.

| आज आपण आपले पुढारी जिनासाहेब यांचा जन्मदिन साजरा करण्यास ' जमलो आहो. त्यांचा व माझा व्यवसाय एकच आहे. आम्ही दोघेहीपण 'बॅरिस्टरच आहोत. राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये आम्ही दोघांनी बरोबरीनेच कार्य केले आहे. काँग्रेसचा त्याजवर राग आहे त्यापेक्षाही जास्त मजवर

राग आहे.

बॅ. जीना यांचा मला जो अनुभव आहे त्यावरून मला असे वाटते की, दुसऱ्याच्या

आहारी न जाणारे असे मुसलमान पुढारी आहेत त्यात जीनासाहेब हे. अग्रगण्य

आहेत. ते कोणाच्या पैशाला कधीही भाळणार नाहीत. त्यांना विकत घेणे

शक्य नाही. त्यांच्या या निर्लोभीपणामुळेच मला त्याजबद्दल अत्यंत आदर आहे.

आता याप्रसंगी आपणास मुसलमान राजकारणासंबंधी दोन गोष्टी सांगणे

अस्थानी होणार नाही असे मला वाटते. मुसलमानांनी, आपण सर्वजण हिंदी

आहोत ही गोष्ट विसरता कामा नये. या देशातच आपला जन्म झाला असून

आपण येथेच मरणार आहोत हे निश्चित. आपला देश स्वतंत्र राहिला तरच

आपण स्वतंत्र राहाणार हेही खरेच आहे. म्हणून देशाच्या स्वातंत्र्याआड येणार

नाही असेच धोरण आपण नेहमी ठेवले पाहिजे हे उघड आहे. 2.20 0 य SONIDO POS Ne EE EROS

जनता : ३० डिसेंबर १९३९.

वि (वाय) ४१०-२१ अ