२५-१२-१९३९ सर्व मागासवर्गीयांनी एकजुटीने वागावे - Page 332

२९४ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

आपले राजकीय कार्य तात्पुरते थांबवून तुम्ही अस्पृश्यता नष्ट केली तर तुम्ही

प्रामाणिक आहा, असे सिद्ध होईल.

मी आपले विचार आपणापुढे निर्भीडपणे मांडले आहेत. मी मोठा देशद्रोही आहे, मी इंग्रजांचा बगलबच्चा आहे, मी स्वराज्याच्या मार्गातील धोंड आहे, मी असुर आहे असा डांगोरा सत्य व अहिंसाभक्त काँग्रेस पक्ष पिटीत असता, मला मानपत्र देऊन आपण आपल्या भाईबंदांना निरुत्तर केले आहे म्हणून आपणास धन्यवाद देऊन मी आपले भाषण संपवितो.