२६-१२-१९३९ अन्याय करणाऱ्यांना स्वराज्य मागण्याचा काय हक्क ? - Page 333

१६६
तुमचे स्वराज्य आणि आमच्यावर [राज्य ] [! ]

बेळगाव (ब जिल्हा स्वतंत्र मजूर पक्षाच्या परिषदेला बेळगाव येथे

| दि. २६ डिसेंबर १९३९ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संबोधित केले.

ते आपल्या भाषणात म्हणाले,

येथे मी पहिल्यांदाच येत आहे. नवीन स्वराज्य स्थापन झाल्यापासून . गेले _ २७ महिने काँग्रेसचे राज्य होते. ते आता गेले आहे आणि अल्पसंख्यांकांनी काँग्रेसचे राज्य गेल्याबद्दल देवाची प्रार्थना केली. परंतु कित्येक जण असा बकवा करीत आहेत की, ता. २२ चा प्रकार हा देशद्रोही आहे. हा कार्यक्रम म्हणजे स्वराज्य मार्गात एक धोंड होय म्हणतात. पण मुसलमान, अस्पृश्य, पारशी वगैरेनी संघटित होऊन राज्यकारभाराविरुद्ध तक्रार केली व न्याय मागितला, गोऱ्हाण्यांची चौकशी करा एवढेच आमचे म्हणणे असता आम्ही देशद्रोही ठरलो

आहो. ।

व्यापक दृष्टीने राजकारणाचा विचार केला असताना त्यात तीन महत्त्वाचे प्रश्‍न

आहेत. एक, हिंदू-मुसलमानात एकी झाल्याशिवाय प्रगती होणे शक्य

नाही. दोन, नुसता हिंदू घेतला तरी त्यातील ब्राह्मण-ब्राह्मणेतर

भेद व तीन, हिंदू-अस्पृश्य लढा. हे प्रश्‍न मतलबाचे आहेत, असे काही लोक

म्हणतात. पण याला मूळ आहे. राष्ट्राची सत्ता आपल्या हाती असावी, असे

काँग्रेस म्हणते. मग तुम्ही मुसलमानांबद्दल काय केले ? हिंदू-मुसलमानात

बरीच दुष्मनी आहे व ती आतापूर्वी कधीच नव्हती, इतकी विकोपास गेली

आहे. हिंदुंच्या राज्यात राहावयाचे नाही, अशी मुसलमानांची भावना

आहे. हिन्दुस्थानचे दोन तुकडे झाले पाहिजेत असे त्यांना वाटते. याला

कारणीभूत कोण तर काँग्रेसच. कै. टिळकांचे मुसलमानांवर प्रेम नव्हते. परंतु

मॉन्टेग्युसाहेब हिंदुस्थानात येतात, असे कळताच तुम्हाला जे पाहिजे ते आम्ही

देतो, असे त्यांनी मुसलमानांना सांगितले व त्यांनी लखनौचा पॅक्ट घडवून

आणला. पण आज काँग्रेसचे लोक काय करीत आहेत ? देण्याधेण्याची

तर यांची भाषा नाहीच. | ॒

जनता : ६ जानेवारी १९४०.