२६-१२-१९३९ अन्याय करणाऱ्यांना स्वराज्य मागण्याचा काय हक्क ? - Page 334

आणि भाषणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन २९६

आता ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद. हा तरी मिटला का ? सर्वांना मानाच्या,

सन्मानाच्या जागा मिळत आहेत, याची ग्वाही काँग्रेसमध्ये घुसलेले आमचे मित्र

रा. ब. आंगडी देतील का ? ते आज येथे हजर आहेत. त्यांना पाहिजे तर

विचारा. काँग्रेसच्या सातही प्रांतात मुख्य प्रधान बामणच ! आणि आमच्या

इलाख्यात ७ मंत्र्यात ३ बामण, १ मराठा पोर, १ पारशी, १ मुसलमान व

१ जैन. . आता आपण नोकऱ्यांकडे वळू. मुंबई इलाख्यातील रेव्हेन्यू खात्याचे

उदाहरण घ्या. त्यात ब्राह्मणांचेच भरताड. मामलेदारांचाच दाखला

घ्या. इलाख्यात एकूण मामलेदार १८८ आहेत, पण जातवारी अशी आहे की

बामण ८३, बनिये ११, मुसलमान २३, मराठे १८, लिंगायत १०, ढोर १ आणि इतर

जातीचे ४३. महालकरी ३५ आहेत. त्यापैकी बामण २०, बनिये २,

मुसलमान ५, मराठा ३, आणि इतर ५. हेडक्लाकं २१७. बामण १११, बनीये १२, प्रभु १०, मुसलमान १४, मराठा १४, लिंगायत ७ आणि इतर ४९. महालकरी व हेडक्लार्क यात अस्पृश्यांपैकी एकही नाही. सर्व केबिनेट ब्राह्मणांच्याच हातात आहे. असेंब्लीच्या १७५ सभासदात ५२ ब्राह्मण आहेत । पूर्वी किती ब्राह्मण होते ? काँग्रेसने ब्राह्मण-ब्राह्मणेतर हा वाद मिटविला काय ?

अस्पृश्यांच्या बाबतीत तर विचारावयासच नको. नुसती ठकबाजी चालली आहे. गांधींनी प्राणांतिक उपोषण केले. महात्मा गेला असता तर दुनिया ओस

पडली नसती. तडजोड करण्याबद्दल भीड घालण्यात आली व मी तडजोड

केली आणि संयुक्त मतदार संघात सामील झालो. परंतु तडजोडीत यांनी १५

च्या १६ जागा केल्या नाहीत. उलट निवडणुकीच्या वेळी माझ्या व्यवस्थेतील

जागा कमी केल्या. परंतु स्पृश्यांसाठी असलेल्या जागेसाठी अस्पृश्याला निवडून आणले नाही आणि यासाठीच मुसलमानांना काँग्रेसचा विश्वास वाटत नाही.

हे काँग्रेसचेच पाप आहे. मंत्रीमंडळात त्यांनी अल्पसंख्यांकांना घेतलेले नाही. त्यांनी.आमच्याविरुद्ध उमेदवार उभे करून चौघांना निवडून आणले. पण त्यातील एकाही अस्पृश्याला मंत्रीमंडळात घेतले नाही. का तर म्हणे ते नालायक आहेत. मग तुम्ही नालायकांना का निवडून आणले ? मला काही मंत्री व्हावयाचे नाही व मला त्याचा लोभही नाही. मला माझ्या समाजासाठी मरावयाचे आहे. अल्पसंख्यांकांना मंत्रीमंडळात घ्यावे म्हणून मीच रव्हर्नरकडे सूचना केली. कारण ज्याच्या हातात अधिकार असतो तोच सत्ताधीश. कलेक्टर-मामलेदार वगैरे मंत्रीमंडळाच्या कागदी चिठोऱ्यांना कोठे विचारतात ? म्हणून आमचे भांडण अधिकाराकरिता आहे. मुसलमानांची