संप पुकारला |
आणि भाषणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन २९८
संप पुकारला कायद्याच्या निषेधार्थ ता. ७ नोव्हेंबर १९३५ रोजी
दोन जिवांचा बळी घेतला. मजुरां काँग्रेसने त्यांच्यावर गोळीबार केला व
कायद्याने लादलेली ही गुलामगिरी होय.
शेकडा ५० टक्के शेतसारा कमी करू असे यांनी अभिवचन दिले. पणी याबद्दल काय केले ? दारूबंदी करू म्हणून यांनी मुंबई येथील लोकांवर दीड कोटी रुपये कर बसविला. माझा दारूबंदीला जो विरोध आहे तोह एवढ्यासाठीच की श्रीमंतांवर बसविलेला कर गरिबांच्या कल्याणासाठी खर्च केला पाहिजे. मुंबईतील लोकांची यांना दारू पितात म्हंणून दया येते. पण आज मुंबई इलाख्यातील १४,००० गावात शाळा नाहीत ! समजा एखादी बाई नागडी आढळली आणि आपणाजवळ २ रु. असले तर त्यातून चोळी घ्यावी की लुगडे ? अंग कशाने झाकेल हे आधी पाहिले पाहिजे. यांना मुंबईच्या लोकांची काळजी, पण लाखो कुळंब्यांची वाट काय ? म्हणून यांचे राजकारण कोणालाही फायद्याचे होणार नाही. आमचा स्वतंत्र मजूर पक्ष न्यायाचा व सत्याचा आहे. मला माझ्या समाजासाठी मरावयाचे आहे.
मांजर आणि उंदीर एकत्र राहू शकत नाही. एकाच टोपलीखाली मांजर व उंदीर झाकून ठेवले तर सकाळीं आपणास काय दिसेल ? गांधी आणि कंपनीचे
दिवाळे आता निघणार आहे. त्यांच्याजवळ पुष्कळसा पैसा असल्याने वरचेवर ते शेवगावला* जातात. एखादा ठराव करावयाचा व तो टाइम्स ऑफ
इंडियामध्ये प्रसिद्ध केला की झाले. आम्हाला मात्र पैसा नसल्यामुळे झोन
तिकीटाशिवाय कोठेही जाता येत नाही. तरसाचा हल्ला चुकविण्यासाठी मेंढ्या जर लांडग्याच्या गोटात जाऊन बसू लागल्या तर ते हिताचे होईल काय ? तुम्ही इंग्रजांशी खरेपणाने लढत असाल तर कौरव-पांडवाप्रमाणे १०५ होऊन लढा. आम्ही खांद्याला खांदा लावून लढू. परंतु गांधी हा
इंग्रजाला कोणीतरी सी. आय. डी. पोलीस मिळाला आहे, असे मला वाटते.
पांढरी टोपी पाहिली की धडकी भरते, परंतु सूर्य उगवला की तो
मावळतोच. यासाठी संघटन करा.
“प्रस्तुत उल्लेख सेवाग्रामला उद्देशून असावा असे वाटते-संपादक.