२६-१२-१९३९ तुमचे स्वराज्य आणि आमच्यावर राज्य ! - Page 337

१६७
लोकसत्ताक राज्य पद्धतीचे
हिंदू समाजास वावडे का ?

बॅ. जीना यांनी मुक्तता दिन पाळण्याचे ठरविल्यानंतर त्यांनी इतर अल्पसंख्यांकांना देखील त्या दिवसाच्या कार्यक्रमात भाग घेण्याची विनंती केली व जीनांच्या विनंतीस मान देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मुक्तता दिनानिमित्त मुंबई येथे महमदअली रोडवर जी प्रचंड सभा भरली होती त्या सभेत भाषण केले. ही सभा हिंदुस्थानच्या इतिहासात अजरामर झाल्याशिवाय राहाणार | नाही. अशा ऐतिहासिक प्रसंगी डाँक्टरसाहेबाँचे भाषण झाले ते तितकेच महत्त्वाचे व चिरस्मरणीय असेच होते. मूळ भाषण इंग्रजीत झाले. त्या भाषणाचे आमूलाग्र भाषांतर या ठिकाणी देणे जरी शक्य नसले तरी त्याचा गोषवारा

आम्ही खाली देत आहोत.

डॉ. बाबासाहेब आपल्या भाषणात म्हणाले,

आजचा प्रसंग घडवून आणल्याबद्दल मी मिस्टर जीना यांचे अभिनंदन करतो

व या प्रसंगाबद्दल मी आपला आनंद व्यक्‍त करतो. तथापि, एका गोष्टीबद्दल मला

खेद वाटतो, तो हा की, या ठरावात जे एकाच अल्पसंख्यांक समाजास प्राधान्य

देण्यात आले आहे तसे न होता इतर अल्पसंख्यांकांचाही जर त्यात विचार झाला

असता तर अधिक बरे झाले असते. सर्वांनी मिळून ठराव तयार केला पाहिजे

होता. तशी गोष्ट घडत नाही, ही खेदाची बाब होय. तरी पण सर करीमभाय

इब्राहिम यांनी काँग्रेसच्या अन्याय्य वर्तनासंबंधी ठराव मांडून रॉयल कमिशनची

जी मागणी केली आहे तीस मी पूर्णपणे पाठिंबा देतो कारण ठरावात नमूद केलेल्या

गोष्टी सत्य आहेत व मागणी न्याय्य व सरळ आहे.

आपल्याला माहीत आहे की मुसलमानांवर काँग्रेसने केलेल्या अत्याचाराची

चौकशी करण्याकरिता मि. जीना यांनी रॉयल कमिशनची मागणी केल्यापासून

काँग्रेसच्या हस्तकांनी व पुढाऱ्यांनी एक अजब युक्तिवाद पुढे आणला

आहे. त्यांनी दिसण्यात अगदी सोपे व सरळ पण खरोखर कपटनीतीने

स न रड

जनता : ३० डिसेंबर १९३९.

*सभेची तारीख दर्शविलेली नाही--संपादक.