३०० डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
पुण्ययुक्त असे एक प्रमेय मांडले आहे. ज्याअर्थी गुन्ह्याची चौकशी झाली नाही
त्याअर्थी गुन्हाच घडला नाही किंवा खुनाची चौकशी झाली नाही म्हणून मुळात
खूनच झाला नाही, असे त्यांचे म्हणणे. १९३५ च्या सुधारणा कायद्यात
कोणत्याही प्रांतात अल्पसंख्यांकांवर अन्याय झाल्यास त्यांचे निवारण करण्याकरिता
प्रांतीय गव्हर्नरास अधिकार देण्यात आले आहेत. त्या खास अधिकारांचा काँग्रेस
सरकारच्या आमदानीत गव्हर्नरांना एकदा देखील अवलंब करावा लागला
नाही. " मुसलमानांवर जर काँग्रेस सरकारकडून जुलूम झाला असता तर
गव्हर्नसनी आपल्या खास अधिकाराचा उपयोग केला असता. तसा खास
अधिकारांचा अवलंब ज्याअर्थी गव्हर्नर्सना करावा लागला नाही किवा तसा प्रसंगच
उद्भवला नाही त्याअर्थी काँग्रेस सरकारच्या हातून मुसलमानांवर जुलूम झालाच
नाही “ हा त्यांचा गोड सिद्धांन्त ! त्याचे गोडवे फक्त काँग्रेसचेच पुढारी गाते
तर एक वेळ क्षम्य होते. पण नुकतेच हिंदुस्थानात ज्यांचे आगमन होऊन सध्या
काँग्रेसच्या पाहुणचारात जे एक बडे इंग्लिश गृहस्थ हिंदुस्थानभर संचार करीत
आहेत ते सर स्ट्रॅफर्ड क्रिप्स यांनी हे प्रमेय उचलून धरले आहे आणि म्हणूनच
या घातुक युक्तिवादाचे खंडण करणे अत्यंत आवश्यक आहे.
तुमच्या सर्वाच्या स्मरणातील गोष्ट आहे की काँग्रेसने अधिकारग्रहण
करण्यापूर्वी ब्रिटिश सरकारशी जो वितंडवाद माजविला होता तो आपल्या
आठवणीत आहे. नेमक्या याच प्रश्नावर म्हणजे गव्हर्नर्सच्या खास अधिकारांबाबतच
कॉँग्रेसने हाय मोकलली होती. अधिकारग्रहण करण्यापूर्वी प्रांतीय गव्हर्नर्स
आपल्या अधिकारांचा आश्रय घेणार नाहीत, असे आम्हाला आश्वासन मिळाल्याशिवाय आम्ही रिकबीत पाय टाकणार नाही, असा काँग्रेसने हट्ट धरला होता, हे कोणीही विसरले नाही आणि आश्चर्य हे की अशा प्रकारचे आश्वासन मिळाले म्हणूनच आम्ही अधिकार ग्रहण केले, अशी निरंतर ग्वाही देणारी काँग्रेस आज उच्च स्वराने सांगत आहे की गब्हर्नसनी खास अधिकारांचा अवलंब केला नाही हाच आमच्या न्याय्य वर्तनाचा दाखला, हाच आमच्या निरपराधित्वाचा पुरावा ! हा कोणत्या नीतीतील युक्तीवाद ?
ज्या प्रांतात काँग्रेसचा अधिकार चालू झाला होता त्या प्रांतात काँग्रेस पक्षाचे इतके मताधिक्य होते की काँग्रेसेतर पक्षांना त्या प्रांतात आपले सरकार स्थापणे ही अशक्य गोष्ट होती. आपल्या मुंबई प्रांतात काँग्रेसच्या हातात जरी इतके बहुमत नव्हते तरी काँग्रेसेतर पक्ष इतके परस्परभिन्न होते की त्यांचे संयुक्त