लोकसत्ताक राज्य पद्धतीचे हिंदू समाजास वावडे का ? ३०१
सरकार बनणे शक्य नव्हते. अशा रीतीने बदली सरकार बनण्याची शक्यता
नसता कोणताही गव्हर्नर लोकसत्तात्मक राज्यपद्धतीत बहुसंख्य पक्षास
कोणत्याही रीतीने दुखवील हे संभवनीय नाही. बहुसंख्याकांच्या ओंजळीने पाणी
प्याल्याशिवाय गव्हर्नरला गत्यंतर नाही. अशा परिस्थितीत गव्हर्नर हा बहुसंख्यांकांच्या हातातील एक बाहुले बनतो. म्हणूनच काँग्रेस प्रांतातील गव्हर्नर्स हे काँग्रेसचे रबर स्टँप होते, असे म्हणण्यास हरकत [नाही ] [आणि ] [अनुभवही ]
तसाच आला. |
बार्डोली तालुक्यातील जप्त जमिनी सरकारी खर्चाने पूर्वीच्या मालकास परत करण्याचे बिल काँग्रेस सरकारने कायदे मंडळात पास करून घेतले. जप्त जमिनी खासगी मालमत्ता होती. त्या परत करण्यात काही विवक्षित व्यक्तीचा फायदा होता. त्या विवक्षित व्यक्ती एका विवक्षित पक्षाच्या होत्या. त्या परत करण्यात सार्वजनिक हिताची अशी कोणतीच गोष्ट नव्हती. असे होते तरी गव्हर्नरने त्या बिलास मान्यता देऊन ते बिल कायद्याच्या स्वरूपात आणले व काँग्रेस पक्षीयांच्या तुंबड्या भरल्या. लोकसत्ता प्रसृत असलेल्या इतर कोणत्याही देशात अशा रीतीचा कायदा होणे शक्य नाही. तिथे अशा रीतीचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला असता. त्याला गव्हर्नरने कधीच मान्यता दिली नसती. पण काँग्रेस प्रांतात ते घडू शकले. याला कारण गव्हर्नरची केविलवाणी स्थिती. म्हणूनच जो गव्हर्नर या विपरित परिस्थितीत कायद्यात तरतूद असूनही स्वत:चे संरक्षण करू शकला नाही तो अल्पसंख्याकांचे संरक्षण करू शकला
असता, अशी अपेक्षा करणे मूर्खपणाचे होय.
मुसलमानांच्या गाऱ्हाण्यांबाबत मला असे वाटते की आज या ठिकाणी मी त्याबद्दल विवरण करण्याची जरूरी नाही. माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी त्याचे
चांगलेच स्पष्टीकरण केले आहे. तेव्हा मी ज्या अल्पसंख्यांक समाजात जन्मलो
आहे त्या अस्पृश्य समाजाच्या गाऱ्हाण्यांबाबत मी बोललो म्हणजे झाले. त्यातही
अस्पृश्यांवर होणाऱ्या अन्यायाचा पाल्हाळीक पाढाही मी वाचणार नाही. तसे
मला करावयाचे असल्यास तुम्हाला आजची रात्रच नव्हें तर आणखी किती तरी
दिवस इथेच डांबून बसावे लागेल. याकरता मी काही थोड्या बाबींचाच उल्लेख
करणार आहे. सर्व अल्पसंख्यांक एकाच बोटोतून प्रवास करीत असले तरी
त्यातील काही उतारू पहिल्या वर्गाचे, काही दुसऱ्या वर्गाचे व काही तिसऱ्या वर्गाचे
आहेत. आम्ही अस्पृश्य मात्र बोटीच्या सामान ठेवण्याच्या तळमजल्यातूनच