३०-१२-१९३९ लोकसत्ताक राज्यपद्धतीचे हिदू समाजास वावडे का ? - Page 340

डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे ३०२

या प्रवासात आमचे प्रवास करणारे [उतारू ] [आहोत, ] [यात ] [संशय ] [नाही. ]

'होत आहेत.

समाजास राऊंड टेबल कॉन्फरन्सनंतर ब्रिटिश सरकारने अस्पृश्य

ती की जातीय निवाड्याद्वारे एक बहुमोल अशी देणगी दिली होती, ही प्रांतात त्यांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात येऊन त्यांच्या वाट्याकरिता ठराविक जागा नियमित केल्या होत्या. शिवाय त्यांना इतर सवसाधारणा मतदारांबरोबर मतदान करण्याचा अधिकार देण्यात आला होता. या योजनेने अस्पृश्य समाजास आपल्या खऱ्या विश्वासाचे खास प्रतिनिधी निवडता येऊन इतर आपुलकीच्या भावनेने काम करणाऱ्या उमेदवारास निवडून देण्याचा त्यास अधिकार देण्यात आला होता. या योजनेने अस्पृश्यांचे समाधान झाले| होते. पण गांधींचे समाधान झाले नाही ! त्यांना अस्पृश्यांवर -उपकार।| करण्याची उकळी फुटली आणि ही योजना बदलली नाही तर प्राणार्पण करण्याचे त्यांनी ठरविले. अस्पृश्यांच्या हितापेक्षा कोणाचेही प्राण अधिक मौल्यवान आहेत, असे मी समजत नाही. पण आमच्यात असे काही लोक होते|

करार' ला मान्यता द्यावी लागली.

त्यावेळी माझी अशी समजूत झाली की, 'पुणे करार' हा जंटलमन्स्‌ अँग्रीमेंट | आहे व काँग्रेस वगैरे सर्व हिंदू लोक स्पृश्यास्पृश्य वाद मिटला आहे, असे समजून

त्या कराराप्रमाणे वागतील व आयामी स्वराज्य हे आपले राज्य आहे, असे| अस्पृश्यांना वाटण्यासारखी परिस्थिती उत्पन्न होईल. पण व्यर्थ ! निवडणुकीची | वेळ आली तेव्हा काँग्रेस आपले खरे स्वरूप प्रकट करू लागली. पुणे कराराने

आम्हास मिळालेल्या १५ जागात लोभाखातर एखाद्या जागेची भर टाकणे दूरच

राहो तर या १५ जागा निष्प्रभ कशा करता येतील हे पाहाण्याचा त्यांनी प्रयत्न चालविला. या सर्व जागांकरिता अशिक्षित व स्वार्थसाधू असे भाडोत्री गुलाम

त्यांनी उभे केले. अशा हेतूने की ते निवडून आल्यावर आपल्या ताटाखालची

मांजरे बनावीत. कुठे आपल्या आश्रमातील झाडूवाला तर कुठे कुण्या काँग्रेस पुढाऱ्यांचा बुटलेर, तर कुठे आपला शिपायी अशी आपली प्यादी उभी करून

स्वतंत्रपणे उभे राहिलेल्या स्वाभिमानी व सुशिक्षित उमेदवारांचा पाडाव करण्याचा

त्यांनी चंग बांधला व आपल्या पैशाच्या जोरावर आपला हेतू तडीस नेला. मिस्टर जिना हे स्वतंत्र मतदार संघास इतके का कवटाळून बसले आहेत हे यावरून चांगलेच सिद्ध होते. मला विरोधी उमेदवार उभे केल्याचां दिषाद