३०-१२-१९३९ लोकसत्ताक राज्यपद्धतीचे हिदू समाजास वावडे का ? - Page 341

लोकसत्ताक राज्य पद्धतीचे हिंदू समाजास वावडे का ? ३०३

न नसता. पण नालायक माणसांना हाती धरून त्यांना आमच्या डोक्यावर

भ्नाचवायला हे धजवतात म्हणून उद्ठेग येतो.

_ निवडणुकीनंतर ज्यावेळेस सरकार बनविण्याची संधी प्राप्त झाली त्यावेळेस

तरी या महाभागांनी हिंदुस्थानाला मिळालेले स्वराज्य आमचे आहे, अशी आमची भावना होईल, असे काही केले का ?

१५ जागांपैकी ११ जागा आम्ही मिळविल्या होत्या. म्हणजे अल्पसंख्यांक अस्पृश्य समाजातील बहुसंख्य समाज आमचे बाजूला होता. काँग्रेसने

भंत्रीमंडळे बनविली त्यावेळेस एक महत्त्वाचे अल्पसंख्यांक म्हणून आमच्या पक्षाला त्यांनी विचारावयाचे होते. कूपर मंत्रीमंडळाचे प्रधानपद स्वीकारून मी

विटाळलेला नव्हतो. मी पूर्ण निष्ठावंत राहिलो होतो. पण नाही.

त्यावेळेस काँग्रेसने प्रतिज्ञापत्राचे बुजगावणे उभे केले. प्रतिज्ञापत्रावर सही

केल्याशिवाय कोणालाही मंत्रीमंडळात न घेण्याचे. कारण असे सांगण्यात आले की

मंत्रीमंडळ एकजीवी, एकध्येयवादी असल्याविना राज्यकारभार हाकता येणार

नाही. तत्त्व म्हणून मी ही गोष्ट मान्य करतो. पण हे तत्त्व तरी काँग्रेसने पाळले

का? आसाम प्रांतात काँग्रेसचे बहुमत नव्हते. त्याठिकाणी अधिकाराची

लालसा उत्पन्न झाल्यामुळे काँग्रेसने हे तत्त्व झुगारून दिले व प्रतिज्ञेची अट काढून

टाकून त्यांनी संयुक्त मंत्रीमंडळ बनविले. याचा अर्थ असा की एकजीवी

मंत्रीमंडळे असावीत हे काँग्रेसचे अबाधित तत्त्व नसून सोयीचे तत्त्व आहे. तसेच

प्रतिज्ञापत्रावर सही करणाऱ्यांची काँग्रेसनिष्ठा ही कसोटी होती, असे म्हणावे तर

काही लोक एका रात्रीत कागदावर सही करून कॉग्रेसमन बनत होते व कार्यभाग

साधत होते. ही काँग्रेसनिष्ठा की ढोंगीपणा ? कोणीही प्रामाणिक मनुष्य असा

थिल्लरपणा करणार नाही व आजच्या अस्पृश्यांनी तो पंथ स्वीकारला नाही, यात

नवल नाही.

अधिकार स्वीकारल्यानंतरची काँग्रेसची कामगिरीही भूषणावह आहे, असे

मला वाटत नाही. थोडक्यात सांगावयाचे म्हणजे हातात कलिंगड मिळाले |

असता माकड चेष्टा करते त्यापेक्षा त्यांनी काही अधिक केले आहे, असे मानण्याचे

कारण नाही. त्यांचा राज्यकारभार म्हणजे Monkey and Melon च्या चेष्टा