३०-१२-१९३९ लोकसत्ताक राज्यपद्धतीचे हिदू समाजास वावडे का ? - Page 342

आणि भाषणे डॉ. बाबासाहेब आंवेडकर लेखन ३०४

दुसरा व हुकूम तिसरा असा लोकल बोर्डाच्या होत्या. कायदा एक, जाहीरनामा

होता. त्यात उद्देश एकच की, निवडणुकीच्या बाबतीत त्यांनी तमाशा चालविला

आमचे उमेदवार नामशेष करावयाचे.

दलितांची अवहेलना, दलितांची दुःखे, त्यांचे हातून दूर होत नाहीत. मी जुनी उदाहरणे देत नाही. काँग्रेसच्याच एका वर्तमानपत्रात, नवाकाळात, गेल्या मे|| महिन्यात प्रसिद्ध झालेली गोष्ट. कल्याणजवळील टिटवाला गावात २ विहीरी|| आहेत. त्यातील एका विहीरीचे पाणी भरण्यास अस्पृश्यांनी सुरवात्त|| केली. अशारीतीने अस्पृश्यांना स्वतंत्ररीतीने पाणी मिळावे ही गोष्ट गावातील॥ हिंदुंना सहन झाली नाही. त्यांनी अस्पृश्यांना पाणी न मिळण्याची एक युक्ती काढली. त्यांनी दुसऱ्या गावाहून एक भंगी आणविला व त्याच्याकडून २ टोपल्या मैला त्या विहीरीत टाकविला. काय ही अमानुष वृत्ती ! आणि दिवसाढवळ्या हा अन्याय काँग्रेस राज्यात चालू काँग्रेस सरकार त्यास आळा घालीत नाही. दुसरी गुजरातेतील गोष्ट. एका गावात अस्पृश्यांनी दिपावली उत्सब साजरा केला म्हणून गावातील स्पृश्य हिंदुंनी त्यांना मरेपर्यंत मारले. असे अनेक दाखले मला दाखविता येतील. त्याचा पाढा मी आज वाचीत नाही. असो.

काँग्रेस हिंदुस्थानला स्वराज्य मागत आहे आणि ते लोकसत्तात्मक पद्धतीचे

असावे, अशी तिची मागणी आहे. या पद्धतीत केव्हाही बहुसंख्यांकांचाच अंमल

चालणार हे निर्विवाद आहे. हिंदुस्थानात हिंदू बहुसंख्यांक आहेत. तेव्हा,

लोकसत्तात्मक राज्यात हिंदूच अल्पसंख्यांकांवर राज्य करणार, ही गोष्ट मान्य

करणे प्राप्त आहे. या हिंदूंच्या लोकसत्तेच्या मागणीबद्दल मात्र एक प्रश्‍न

विचारायचा आहे. तो असा की, हिंदू लोकसत्ता शासन पद्धतीस लायक आहेत का ? चातुर्वर्ण्यपद्धतीमुळे मूलतःच जो समाज इतका विभागला गेला आहे की एका

विभागातील जनतेचा दुसऱ्या विभागातील व्यक्तीवर मुळीच विश्वास नाही. एकास दुसऱ्याचा अंमल सहन होत नाही. अशा सामाजिक घटनेत अल्पसंख्यांकांना

स्वतःच्या संरक्षणाकरिता राज्यघटनेत काही योजना करण्याची मागणी केल्याशिवाय. गत्यंतर नाही आणि अल्पसंख्यांक आज तीच मागणी पुढे मांडीत आहेत. अद्याप

अल्पसंख्यांकांनी आयर्लंडच्या इतिहासाची हिंदुस्थानात पुनरावृत्ती केली नाही. अल्स्टरचे पुढारी सर एडवर्ड कार्सन यांना दक्षिण आयर्लडचा पुढारी रेडमंड वाटेल ती संरक्षणे देण्यास तयार होता. पण कार्सनने चोख उत्तर दिले की ' तुमच्या संरक्षणाला लावा आग! आम्हाला तुमचा अंमल नको ! ' अल्पसंख्यांकांनी ती वृत्ती अद्याप धारण केली नाही हे हिंदुस्थानचे नशीब.