१६८
| शाहू छत्रपतींनी
ब्राह्मण्याचा किल्ला ढासळून [टाकला ]
| कोल्हापूर संस्थान दलित प्रजा परिषदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ३० डिसेंबर १९३९ रोजी भाषण झाले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या भाषणात म्हणाले,
स्वागताध्यक्ष, भगिनी, बंधुजन व निमंत्रित पाहुणे जनहो.
आपण माझी अध्यक्षस्थानी नेमणूक केलीत त्याबद्दल मी आपला फार आभारी आहे. आजची परिषद ही इतर परिषदांपेक्षा निराळ्या परिस्थितीत भरत आहे. या: परिषदेत होणारी भाषणे जबाबदारी ओळखूनच करावयास हवीत. आपली आजची परिस्थिती फार नाजूक आहे. ही गोष्ट विसरता कामा नये. आम्ही बाहेरून आलेले इंग्रजी राज्यातील प्रजाजन व स्थानिक कोल्हापूर संस्थानचे प्रजाजन यांच्या परिस्थितीत महदंतर आहे हे विसरून चालणार नाही. या परिषदेत भाग घेणारांनी आपली भाषणे आपल्यावरील जबाबदारी ओळखूनच केली पाहिजेत, असा मी आपणास आगाऊ इशारा देत आहे. आता लवकरच १९३९ हे साल संपून नवे वर्ष सुरू होणार आहे. कोल्हापूरच्या इतिहासात चालू साल फारच गुंतागुंतीचे झालेले आहे. चालू सालात ह्या संस्थानात रोज परिषदा झाल्या असून ही तिसरी प्रसिद्ध परिषद आहे. पहिली काँग्रेस प्रजा परिषद आहे तिचे अध्यक्षस्थान डॉ. पट्टाभिसीतारामय्या यांनी मंडित केले होते. दुसरी परिषद रयत सभेने भरविली होती. या परिषदेचे अध्यक्षस्थान रा. मोरे यांनी स्वीकारले होते. आपण त्या परिषदेस हजर असालच, असे मला वाटते. आजची आपली परिषद ही दलित प्रजा परिषद होय. आता ही परिषद निराळी का भरविण्यात येत आहे, असा प्रश्न उपस्थित होणारच. प्रजा परिषद व रयत सभा यांना न मिळता हा सवतासुभा का करण्यात आला, अशी शंका येणे साहजिकच आहे. ही तिसरी परिषद व त्याचा अध्यक्ष मी असल्यामुळे तर टीकाकारांच्या टीकेला जास्तच जोर चढणार. गेल्या मे महिन्यात पन्हाळ्यास असता रयत सभेचे चालक मला त्यांच्या पारेषदेचे अध्यक्षस्थान स्वीकारण्याबाबत आग्रह करीत होते. मी त्याजकडून विचार करण्यासाठी दोन तासांचा अवधी मागून घेतला. त्या दोन
जनता : १३ जानेवारी १९४०.