शाहू छत्रपतींनी ब्राह्मण्याचा किल्ला ढासळून टाकला ३०७
तासात मी कोल्हापुरी राजकारणाची पूसतपास केली. विचाराअंती रयत सभेचे अध्यक्षस्थान न स्वीकारणेच बरे, असे मी ठरविले. आजची परिषद भरवून
सवतासुभा का करता, असे विचारण्याचा हक्क निदान रयत सभावाल्यांना तरी खास नाहीच. त्यांनीही प्रजा परिषदेनंतरच आपली परिषद भरविली होती. मग आम्हाला निराळी परिषद हवीशी वाटली तर त्यात गैर ते काय ?
प्रजा परिषदेच्या चालकांनाही माझी सहानुभूती हवी होती. माझ्या मते प्रजा परिषदेचा हेतू प्रजेचे कल्याण करणे हा नसून कोल्हापूरकरांचा द्वेष करणे हा होता. अर्थात मला त्यांच्या चळवळीबद्दल सहानुभूती वाटणे शक्य नव्हते. कोल्हापूर संस्थान हे काही नंदनवन नव्हे, ही गोष्ट मलाही मान्य आहे. पण कोल्हापूरच्या आसपास अनेक लहान लहान संस्थाने असून त्यातील प्रजेचीही गळचेपी चालू असता कोल्हापूरातच चळवळ करणाऱ्यांचे हेतू अशुद्ध असावे असा संशय येणे स्वाभाविकच नाही का ?
कोल्हापूरसंबंधी एक गोष्ट अगदी निश्चित आहे व या गोष्टीबद्दल अस्पृश्यांना
व मला कोल्हापूरचा अभिमान वाटतो. कै. शाहू महाराजांनी कोल्हापुरातच खरी
लोकशाहीची मुहूर्तमेढ रोवली ही ती गोष्ट होय. आपण गोब्राह्मण प्रतिपालक
छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करीत असतो. शिव छत्रपतीला
ब्राह्मण्य नष्ट करता आले नाही. आपल्या राज्याभिषेकासाठी सोने देऊन
काशीहून गागाभट्टाला त्यांना आणावे लागले. ब्राह्मण्याची नांगी तोडण्याबाबतीत
कै. शाहू छत्रपती हे शिवरायापेक्षाही श्रेष्ठ होत, असे म्हटल्याशिवाय गत्यंतर
नाही. शाहू राजांना वेदोक्त अधिकार नाही असे सांगणाऱ्या ब्राह्मणांना पुण्याच्या
लोकमान्य टिळकांचा व तेथील भटशाहीचा आधार असतानाही त्यांना शाहू
छत्रपतींनी ठोकरीने उडविले, ही गोष्ट विसरता येण्याजोगी खास नाही.
कै. शाहू छत्रपती महाराजांच्या अंगी दोष असतील. पण मी असे विचारतो की
कोणता राजा निर्दोष आहे ? निव्वळ दोषांकडे पाहण्यात अर्थ नाही. ब्राह्मण्य
नष्ट झाल्याशिवाय समाजाची उन्नती होणे नाही. त्यांनी ब्राह्मण्य नष्ट
करण्याचा धडाडीने प्रयत्न केला यातच त्यांची थोरवी आहे. कै. शाहू छत्रपतींनी
समाजातील विषमता नष्ट करण्याचा आटोकाट प्रयत्न केला व ब्राह्मण्याचा
बालेकिल्ला ढासळून टाकला ही काही लहान कामगिरी नाही. माझ्या
सार्वजनिक आयुष्याचा श्रीगणेशा कै. छत्रपती शाहू महाराजाच्या अध्यक्षतेखाली
झालेल्या माणगावच्या परिषदेतच मी गिरविला होता, ही गोष्ट येथे नमूद करणे
आवश्यक आहे. त्यांना व मला प्रिय असलेल्या समतेच्या प्रचारासाठी
रु. २,५०० देऊन त्यांनी मला सदैव ऋणी केले. असे असल्यामुळे मी प्रजा
परिषदेशी संबंध ठेवला नाही, हे उघड आहे. रयत सभेचाही पाया शुद्ध नाही,