आणि भाषणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन ३०८
मी त्या सभेने भरविलेल्या परिषदेचे अध्यक्ष अशी विचाराअंती खात्री झाल्याने
स्थान नाकारिले, हे सांगणे नकोच. रयत सभेचा हेतू प्रजेचे कल्याण हा नसून, | महाराजांची हाजी हाजी करून अधिकाऱ्यांचे आपसातील लढे लढविणे व स्वार्थ | साधणे हा आहे. संस्थानातील सर्वच लोक महाराजांचे प्रजाजन आहेत. ही सर्व प्रजा काही समदुःखी नाही, प्रजेतील काही लोक सुखी तर काही दुःखी | आहेत. या सुखी व दुःखी लोकांची एक मोट बांधण्यात काय अर्थ आहे ? अशी मोट बांधल्याने एकमुखी भागणी कशी करता येणार ? भगिनी व बंधुजनहो, दुःखीजनांना एकमुखी मागणी करता यावी म्हणून आज आपण ही दलित प्रजा परिषद भरविली आहे. आपण सर्व राजनिष्ठ प्रजाजन एकत्रित झालो आहोत. प्रजा परिषदेत मराठ्यांचाच विशेष भरणा होता. त्या परिषदेत अस्पृश्य एकही नव्हता. राजनिष्ठेमुळे अस्पृश्यांचा प्रजा परिषदेस विरोध होता, हे सांगणे नकोच.
आता आपण या संस्थानातील प्रजा कशी वाटली गेली आहे हे पाहू. या संस्थानातील एकंदर प्रजा ९,९७,००० असून त्यात ८,६६,००० हिन्दू आहेत व १,१०,००० अस्पृश्य असून मुसलमानांची संख्या ४१,८६६ आहे. ठोकळ मानाने पाहता एकंदर लोकसंख्येत ११% अस्पृश्य ५% मुसलमान आहेत, असे म्हणण्यास हरकत नाही. या अकरा टक्के अस्पृश्यांपैकी फक्त ४८१ अस्पृश्य सरकारी नोकरीत आहेत व त्यापैकी बहुतेक झाडूवाले, घोडेवाले, नालबंद वगैरे हीन
तर्हेच्या नोकऱ्यावरच आहेत, हे सांगणे नकोच.
आता संस्थानातील शिक्षण संस्थांचा आपण विचार करू. संस्थानाने प्रसिद्ध
केलेल्या आकड्यांवरून कोणकोणत्या विद्यार्थी वसतिगृहास सरकारी मदत काय मिळते हे पुढील आकड्यांवरून कळून येईलच.
| | रूपये
(१) आर्य समाज वसतिगृह ५,०१२
(२) कर्नल बोर्ड हाऊस ३,६००
(३) वैदिक वसतिगृह ३,६००
(४) मराठा वसतिगृह ११,३१४
(५) मुसलमान वसतिगृह ९,४६०
(६) इतर वसतिगृह ५,०१०
(७) मिस क्लार्क वसतिगृह ६२५
(८) इन्दुमती वसतिगृह ७००