३१-१२-१९३९ माझ्यामागे तुमचे ऐक्य अभेद्य ठेवा - Page 352

आणि भाषणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन ३१४

व जबाबदारीची फार आवश्यकता हिन्दुस्थानच्या आजच्या परिस्थितीत जागृती

उपस्थित होणार आहेत. स्वराज्य आहे. युद्धोत्तर हिंदुस्थानापुढे मोठमोठे प्रश्‍न

दुसऱ्यास गुलामगिरीत सर्वासच हवे, यात शंका नाही. पण एकाचे स्वराज्य

डांबण्यास कारणीभूत होणार नाही, अशी आपण सर्वानी दक्षता बाळगली पाहिजे. अल्पसंख्यांकांच्या मागण्या या वरील भीतीच्या निदर्शकच आहेत. ही भीती नाहिशी करण्यासाठी व आपणापुढील प्रश्‍न सोडविण्यासाठी अल्पसंख्य व बहुसंख्य या दोन्ही लोकात आपण जागृती व जबाबदारीची जाणीव उत्पन्न

केली पाहिजे, असे माझे सांगणे आहे.

आज हिन्दी राजकारणात मोठी विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. हा विचित्रपणा लक्षात येण्यासाठी आपण गेल्या पिढीचे राजकारण व या पिढीतील

राजकारण यांची तुलना करू.

गेल्या पिढीतील गोखले, टिळकांचे राजकारण व आजचे गांधी राजकारण यामध्ये एक मोठा फरक आहे. गेल्या पिढीतील राजकारणास विद्दत्तेची जरूरी

भासत असे. आजच्या राजकारणात बोटवाती, काडवाती करणारांची जरूरी भासत आहे. विद्वानांची त्यातून खड्यासारखी उचलबांगडी करण्यात येत

आहे. आजचे राजकारण हे आंधळ्याच्या माळेच्या हाती गेले आहे. ही अत्यंत

अनिष्ट गोष्ट झालेली आहे. देशाची प्रगती होत राहण्यास विविध विचार व

वादविवादाचे निरनिराळे प्रवाह आवश्यक आहेत. अशा भिन्न विचारांच्या

प्रवाहातूनच हमेशा प्रगती होत असते. आंधळ्याच्या माळेमागून एकाच मार्गाने

देश जात राहिला तर तो खळग्यात पडल्याशिवाय रहाणार नाही, हे खास. राजकारणात एकच पंथ निर्माण करणे हा चालू राजकारणातील हेतू

आहे. जागृती, नानातन्हेचे विचार व साधक बाधक प्रमाणे यांचे या राजकीय

पंथास वावडे आहे. त्याच त्या गोष्टीची री ओढीत राहण्यात फायदा काहीच नाही. आज लोक गांधीवेडे झाले आहेत. गांधीवाक्य हे ब्रह्मवाक्य होऊ पाहत

आहे. या गांधी वेडाबरोबरच ढोंगबाजीही खूप वाढू लागली आहे. केवळ

स्वार्थासाठी काँग्रेसला चार आणे देऊन व्यभिचार करणारे अनेक हरीचे लाल आज पैदा होत आहेत. जागृती व जबाबदारी नाही तेथे तशी बिकट स्थिती होणारच. आपल्या कऱ्हाड म्युनिसीपालिटीत भिन्न मताचे व भिन्न पक्षाचे सभासद आहेत. यावरून स्थानिक मतदार विचारी असावेत, असे मला वाटते. आपल्यात विचार जागृत आहेत म्हणून मी आपले अभिनंदन करतो. आपण दिलेल्या मानपत्राबद्दल पुनः एकदा आपले आभार मानून मी आपले भाषण पुरे करतो.