युद्धोत्तर हिंदुस्थानपुढे मोठमोठे प्रश्न उपस्थित होणार आहेत ३१५
त्यानंतर स्थानिक महारवाड्यातील समारंभास डॉक्टरसाहेब हजर राहिले. तेथे अलोट जनसमुदाय दुपारी चार वाजेपासून डॉक्टरसाहेबांच्या भेटीसाठी तिष्ठत राहिला होता. जमलेल्या मंडळीस आपसात एकोपा राखण्यास व पुढील निवडणुकीत स्वतंत्र मजूर पक्षाचा एक प्रतिनिधी निवडून आणण्यास सांगून डॉक्टरसाहेब आपल्या बरोबरील मंडळीसह साताऱ्यास आपल्या निवासस्थानी
गेले.