आणि भाषणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन ३१८
होय. महार वतन प्रत्येक महारवाडा हा माणसांचा कोंडवाडा व गुलामवाडाच
गुलामगिरीच्या द्योतक आहेत. त्या नष्ट व महारवाडा या दोन गोष्टी सनातन
झाल्याच पाहिजेत. स्पृश्यांनी या गोष्टी नष्ट करण्यास कितीही आडकाठी केली तरी त्या गोष्टी नवीन स्वराज्यात मी नष्ट केल्याशिवाय राहाणार नाही, हे खास. पण वतन नष्ट होईपर्यंत वतनाची बेडी ढिली करण्याचे प्रयत्न आपण केले पाहिजेत, हे विसरू नका. चळवळ करून जुडीवाढ आपण बंद पाडली पाहिजे. गावकामगारास पगारी नोकऱ्या दिल्या पाहिजेत. गावाबाहेरच्या कामासाठी त्यांना आठ आणे रोज मिळाला पाहिजे. गावकामगारांची ही गाऱ्हाणी सहा महिन्यात नष्ट करण्यात आली नाहीत तर गावकामगारांनी इलाखाभर संप पुकारला पाहिजे. काही झाले तरी तुम्ही मात्र आपल्या जमीनी
सोडू नका.
आता रा. सावंत यांनी सातारा येथे चालविलेल्या अस्पृश्य विद्यार्थी वसतिगृहाकडे आपण वळू या. चळवळ करताना आम्हा अस्पृश्य पुढाऱ्यांची
मोठी केविलवाणी स्थिती होत असते. इतर वर्गाच्या राजकीय पुढाऱ्यांची अशी
दैना कधीच होत नाही. मि. जिना वसतिगृहे चालविण्याच्या फंदात कधीही पडणार नाहीत. आम्हा अस्पृश्यांना चळवळ करताना बहुरूपी बनावे
लागते. आम्हाला वसतिगृहे काढावी लागतात, पत्रे चालवावी लागतात, गावोगाव वणवण भटकावे लागते. थोटा नवरा केला की त्याच्या पत्नीस त्याला
आंघोळ घालावी लागते तशीच आमची गत आहे. याबाबतीत आपल्यातील
शिक्षक वर्गावर माझा फार कटाक्ष आहे. ते सुशिक्षित असतात. आमच्या.
चळवळीमुळे त्यांना चाकऱ्या मिळतात, तरी ते बेफिकिर राहतात, असा त्यांवर.
माझा आरोप आहे.
साताऱ्यास रा. भाऊराव पाटलांचे एक वसतिगृह असता सावंतांचे वसतिगृह. कशाला ? अशी शंका कोणास येईल. पण त्याचे उत्तर फार सोपे आहे. रा. पाटलांच्या वसतिगृहातून बाहेर पडणारे अस्पृश्य विद्यार्थी एकतर. भीष्म-द्रोणाप्रमाणे ' अर्थस्य पुरुषोदासः ` या न्यायाने गुलामीवृत्तीचे निपजणार नाही तर ते कचाप्रमाणे तरी होणार, हे उघड आहे. आपल्या विद्यार्थ्यांना संपत्तीचे गुलाम होणे भाग पडू नये म्हणून रा. सावंत यांच्या वसतिगृहासारख्या. संस्थांची अत्यंत जरूरी आहे हे सांगणे नकोच.