डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे ३२२
झाडा-झुडपाना, पशु-पक्षांना व साप आहे. स्पृश्य लोक दगडा-घोंड्यांना,
अस्पृश्य पुढारी कसा मानवणार विंचवांनाही देव मानतील पण त्यांना
बहुसंख्य मजूर व शेतकरी हे स्पृश्यच आहेत ही गोष्ट चालू परिस्थितीत विस
भागणार नाही.
आमच्या पक्षाचे काय संघ नाहीत ? का रा. प्रधान व रा. मडकेबुवा यां कामगार पुढारी आमच्याजवळ नाहीत ? आमच्या पक्षात काय कमी आहे : पण आम्ही सनातनी नाही. आमचा पक्ष अस्पृश्यांचा पक्ष मग स्पृश्य त्याचा विटाळ कसा होणार नाही !
आमचे मडकेबुवा हे महार पडले. भाई, संघ, लढाऊ इतक्यापुरतीच त्यांना माहिती असणार. त्यांना बुरइवा, प्रॉलिटॅरिएट, वगैरे जडजंबाळ शब्द कसे पेलणार ? हे शब्द नाहीत तर द कामगार पुढारी कसे होणार ? पणते खरे पुढारी आहेत. म्युनिसीपालिटीतील
कामगारांना विचारा, रेल्वेच्या पोर्टरांना विचारा. ते सर्व मडकेबुवा हेच आमचे खरे कामगार पुढारी आहेत असे एक आवाजाने सांगतील. चेंबूर
येथील कचरापट्टीत काम करणाऱ्या मजुरांचा व इतर म्यु. कामगारांचा त्यांनी एका फटक्दासरशी लाखो रुपयांनी पगार वाढवून दिला. असे हे पुढारी आमच्या पक्षात आहेत. पण नावडतीचे मीठ अळणीच. त्याला कोण काय करणार ?
काही लोक मला मानतात तेवढ्यातच मी संतुष्ट आहे. तत्त्व सोडून मला काँग्रेसचे पुढारी, मजुरांचे पुढारी, शेतकऱ्यांचे पुढारी होण्याचा काहीच हव्यास
नाही.*
काँग्रेसने आपल्यातून फोडलेले रा. ब. राजा, रा. देवरुखकर व राजभोज हे आपणात परत आले आहेत. ही आनंदाची गोष्ट होय. इतर चुकलेली वासरेही परत येणारच अशी माझी खात्री आहे. आपल्यातील मधाच्या ई लालचीने बारगळलेल्या तरुणांना, मी असे विचारतो की, कोणाच्या चळवळीने तुम्हास चाकन्या मिळतात याचा विचार करा व आपला मूर्खपणा सोडून द्या. सेक्रेटरिएट मध्ये शिपाई ठेवण्याबद्दल माझे गव्हर्नरशी सन १९२६ साली पहिले भांडण झाले. त्याची मला चांगलीच आठवण आहे. आज
“उपलब्ध अंकातील पुढील बावीस ओळी अस्पष्ट आहेत. |