४-२-१९४० देशाच्या हितासाठी मी आपले वैयक्तिक हित सोडून देण्यास तयार आहे - Page 362

१७४
नुसत्या राजकीय [स्वातंत्र्याने ]
जनतेचे कल्याण होईल, [हा ] [भ्रम ]

स्वतंत्र मजूर पक्षातर्फे महाड येथे १९ मार्च १९४० रोजी 'अस्पृश्य स्वातंत्र्यदिन ' समारंभ आयोजित करण्याविषयक पत्रक काढण्यात आले होते. ते खालीलप्रमाणे-

“ता. १९ मार्च १९२७ रोजी महाड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अध्यक्षतेखाली अस्पृश्य समाजाची विराट सभा झाली. त्या सभेत डॉ. आंबेडकरांनी अखिल भारतीय अस्पृश्य समाजाच्या वतीने स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या लोकशाहीप्रणित तत्त्वत्रयीची जाहीर घोषणा केली. सभेनंतर हजारो अस्पृश्यांनी मिरवणुकीने चवदार तळ्यावर जाऊन सार्वजनिक पाणवठ्यावर पाणी भरण्याचा आपला नागरिक स्वातंत्र्याचा आणि समानतेचा हक्क प्रस्थापित केला. त्या प्रसंगाचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन यापुढे १९ मार्च हा दिवस अस्पृश्य जनत्तेने स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करण्याचा प्रघात सुरू करणे अवश्य आहे.

महाड येथे १९ मार्च १९४० मंगळवार रोजी, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली अस्पृश्य वर्गाची प्रचंड जाहीर सभा, मिरवणूक, झेंडा वंदन, स्वातंत्र्याची प्रतिज्ञा वगैरे कार्यक्रम होणार आहे.

ज्या ज्या अस्पृश्य बंधुभगिनींना शक्य असेल त्यांनी महाडच्या ता. १९ मार्चच्या समारंभात अवश्य भाग घ्यावा. ज्यांना महाडास येता येत नसेल त्यांनी त्या दिवशी आपापल्या गावी स्वातंत्र्योत्सव करावा. उत्सवाचा कार्यक्रम सर्व- साधारणपणे खालीलप्रमाणे असावा--

१. सकाळी घरोघरी स्वतंत्र मजूर पक्षाचा झेंडा उभारावा.

२. डॉ. बाबासाहेबांच्या फोटोसह झेंड्याची सार्वजनिक मिरवणूक वांजत गाजत दांडपट्टा वगैरेसह काढावी च महारवाड्यात मंडप श्रृंगारून झेंडावंदन करावे.

३. झेंडावंदनानंतर सर्व स्त्री पुरुषांनी व मुलाबाळांनी स्वातंत्र्य प्रतिज्ञा करावी.

४. सभा, भाषणे वगैरे कार्यक्रम करावा.