४-२-१९४० देशाच्या हितासाठी मी आपले वैयक्तिक हित सोडून देण्यास तयार आहे - Page 363

नुसत्या राजकीय स्वातंत्र्याने . . . . . . हा भ्रम ३२५

विशेष सूचना :-स्वतंत्र मजूर पक्षाचे निशाण--

हा झेंडा लाल रंगाचा असून त्यावर मधोमध ' स्वतंत्र मजूर पक्ष ' असे लिहिले

आहे. झेंड्याच्या डाव्या बाजूस वरच्या कोपऱ्यात ११ तारे दाखविलेले आहेत.

हे ११ तारे हिन्दुस्थानातील ११ प्रांतांचे द्योतक होत. वरील सर्व प्रांतात स्वतंत्र मजूर पक्षाचा असा हा झेंडा सदैव फडकत राहिला पाहिजे. झेंड्याचा आकार सोयीप्रमाणे लहान मोठा करण्यास हरकत नाही.

"स्वातंत्र्य दिनाची. प्रतिज्ञा'

“ आम्ही माणुसकीचे हकक मिळविणार अशी आमची प्रतिज्ञा आहे. स्पृश्य समाजाने आम्हास बहिष्कृत करून वाळीत टाकले असून तो समाज आम्हास अन्नपाणी व जीवनास इतर आवश्यक असणारी सुख साधनेही मिळवू देत नाही. त्याने आम्हास महारवाड्यात डांबून टाकिले आहे. आम्हास उद्योगधंदा करणे व आमच्या लायकीप्रमाणे चाकरी मिळणे या गोष्टीही स्पृश्यांनी दुरापास्त केल्या आहेत. आमच्या या दुःस्थितीची सर्व जबाबदारी स्पृश्य वर्गावरच आहे. आमचे मानवी हक्क हिरावून घेणाऱ्या या लोकांच्या हाती सर्व राजसत्ता देणे म्हणजे माकडाचे हातात कोलित दिल्याप्रमाणेच होणार आहे.

काँग्रेस सरकारने महार वतनदार कामगारांना विनावेतन राबवून पज्नास हजार _ अस्पृश्य कामगारांवर लादण्यात आलेली सनातनी बिगारी नाहीशी करण्यासाठी काहीही केलेले नाही. यावरून काँग्रेस सरकारचे “हरिजन प्रेम' उत्तम व्यक्त होत नाही काय? आपल्या समाजाची, काँग्रेस सरकारच्या राज्यात देखील पूर्वापार पद्धतीप्रमाणे शारिरीक, आर्थिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक वृ आध्यात्मिक पिळवणूक चालू होतीच. म्हणून आमचे असे ठाम मत झाले आहे की, आमच्या शत्रूच्या हाती राज्यसत्ता सर्वस्वी देणे हे आमच्या दृष्टीने अत्यंत धोक्याचे आहे.

आपणास माणुसकीचे अधिकार मिळविण्याचा मार्ग म्हटला म्हणजे देशाच्या राज्यकारभारात आपला वाटा मिळविणे हाच होय. म्हणून अस्पृश्यांना राजकीय सत्तेचा वाटा मिळवून देऊन मानवी हक्क मिळवून देण्याची पुनरपी आम्ही प्रतिज्ञ करीत आहो. | |

जातीभेद मोडून जाती, धर्म व वर्ण हे ऐहिक व्यवहाराच्या आड येणार नाहीत

अशी घटना करणे हे आमचे ध्येय आहे, असे आम्ही समजतो.

डॉ. आंबेडकरांनी आपल्या समाजास राजकीय सत्ता मिळवून देण्यासाठी जो लढा चालू केला आहे तो आम्हास पूर्णपणे मान्य असून डॉ. बाबासाहेबांच्या

आज्ञेनुसार आम्ही त्या लढ्यात भाग घेण्यास सदैव सज्ज राहू अशी आमची प्रतिज्ञा

DNC PIN दनी

१ जनता : १६ मार्च १९४०.