आणि भाषणे डॉ. बाबासाहेव आंवेडकर लेखन ३२६
संदर्भात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना चवदार तळ्याच्या लढ्याच्या
लागले. त्यात अस्पृश्य समाजाचा हायकोर्टापर्यंत न्याय मिळविण्यासाठी जावे
विजय झाला. त्यासंबंधी संपूर्ण वृत्तांत दि. २७ मार्च १९३७ च्या ' जनतेत '
प्रकाशित झाला. तो येणेप्रमाणे--
'* चवदार तळ्याच्या लढ्यात मिळालेला विजय |
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपली स्वाभिमानाची आणि माणुसकीच्या हक्काची चळवळ १९२७ साली मार्च महिन्याच्या १९ व्या तारखेला सुरू केली आणि अस्पृश्य समाजाच्या सर्वागीण उन्नतीची मुहूर्तमेढ रोविली होती. महाड येथील चवदार तळ्यावर पाणी पिण्याचा आपला समान हकक आहे अशी अस्पृश्य बांधवांनी मागणी करून त्याप्रमाणे चळवळ सुरू करताच तेथील सनातनी व काही विघ्नसंतोषी स्पृश्यांनी या समान हक्काच्या लढ्यास विरोध केला आणि अस्पृश्यांविरुद्ध मनाई मिळवून कायदेशीररितीने या चळवळीला प्रतिबंध केला होता. परंतु हा दावा महाडच्या सब-जज्जानी काढून टाकल्यावर याच सनातनी मंडळीनी त्यांच्याविरूद्ध ठाणे कोर्टात अपिल केले. तेथे बरेच दिवस या खटल्याबाबत काम होऊन शेवटी याही कोटनि खालच्या कोर्टाच्या हुकूमाबर निकाल देताच महाडच्या स्पृश्य मंडळींनी पुन्हा एकदा प्रयत्न करून, अस्पृश्य समाजाच्या या समान हक्काच्या लढ्याचा नायनाट करण्याचा प्रयत्न करण्यासाठी मुंबई हायकोर्टाकडे धाव घेतली. येथे हे अपिल बरेच दिवस लांबणीवर
पडले. परंतु शेवटी गेल्या महिन्यात सुनावणीस निघाले. या खटल्यात
डॉ. बाबासाहेब आंबेडकर व इतर चौघे अस्पृश्य प्रतिनिधी यांना प्रतिवादी केले होते. कोर्टाने या खटल्याची सर्व प्रकारची हकिगत तेथील परिस्थिती, या तळ्याचे ऐतिहासिक महत्त्व आणि जुना रीतिरिवाज याविषयी माहिती करून घेतली आणि काही दिवस निकाल देण्याचे तहकूब करून शेवटी ता. १७-३-३७
रोजी न्या. ब्रमफील्ड यांनी या खटल्याचा निकाल जाहीर केला. त्यांनी
निकालात स्पष्टपणे सांगितले की, चवदार तळ्याच्या मालकीबद्दल आता वादीचे
काही म्हणणे उरलेले नाही परंतु लॅन्ड रेव्हेन्यू कोडप्रमाणे महाडचे चवदार तळे
हे सरकारच्या मालकीचे होते आणि डि. म्यु. अँक्टप्रमाणे सध्या या तळ्याची मालकी महाड म्युनिसीपालिटीकडे आहे. असे प्रतिवादीने प्रतिपादन केले आहे. या तळ्याचा मुसलमानासारख्या अहिंदू समाजाकडूनही उपयोग केला- जातो. यावरून फक्त स्पृश्य लोकांनाच या तळ्याचा उपयोग करण्याचा
हक्क पोचत नाही. तथापि प्राचीनकाळी या तळ्यावर अस्पृश्य लोकांना पाणी