१९-३-१९४० नुसत्या राजकीय स्वातंत्र्याने जनतेचे कल्याण होईल, हा भ्रम ! - Page 365

नुसत्या राजकीय स्वातंत्र्याने .. . . . . हा भ्रम ३२७

भरण्याची व पिण्याची मनाई होती असे वादीचे म्हणणे आहे. परंतु या प्राचीन रूढीने वादीला कायदेशीर हक्क पोचत नाही. तशात ही प्राचीन रुढी आहे असेही वादीना समाधानकारकरित्या पुराव्याने सिद्ध करता आले नाही. अशा- रीतीने या खटल्यात शेवटी डॉ. बाबासाहेब आंबेडकर विजयी झाले आणि महाडचे _ चवदार तळ्यात यापुढे अस्पृश्यांना कायदेशीररितीने पाणी पिण्यास व वापरण्यास हक्क प्राप्त झाला आहे. डॉ. बाबासाहेबांनी अस्पृश्य समाजाच्या सर्वागीण

चळवळीची जी दहा वर्षांपूर्वी मुहूर्तमेढ केली होती त्यात आज अपूर्व असे यश मिळाले आहे. यावरून संघटना आणि शिस्त या चळवळीने आपणाला कोणतेही

अवघड कार्य कसे यशस्वी करता येते याचे अवलोकन करणे अवघड नाही. या

खटल्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर इत्यादि प्रतिवादीतर्फे मि. गुप्ते व मि. मोडक ` वकील यांनी कायद्याच्या दृष्टीने केलेल्या कामगिरीस ते अभिनंदनास प्राप्त

आहेत ".

'' डॉ. आंबेडकर यांचे महाडास प्रयाण

ता. १९ मार्च १९४० रोजी महाड, कुलाबा जिल्हा येथे अस्पृश्यांचा १४ वा

स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी डॉ. बाबासाहेब हे ता. १८ रोजी धरमतर मार्गाने

महाडास जाण्यासाठी मुंबईहून निघाले. त्यांजबरोबर स्वतंत्र मजूर पक्षातील

त्यांचे सहकारी श्री. दौलतराव जाधव, श्री. मडकेबुवा, श्री. भातनकर, श्री. पाटणे,

श्री. सवादकर व श्री. सहस्त्रबुद्धे वगैरे मंडळीही होती.

महाड येथे जाताना रेवस बंदरावर रा. नारायणराव थळे व रा. कुंडलीक कमळ

पाटील या चरी शेतकरी संघ व अलीबाग येथील स्वतंत्र मजूर पक्षाच्या आग्री

पुढाऱ्यांनी त्यांना पुष्पहार अर्पण केले.

यानंतर धरमतर येथे बंडू पांडुरंग पाटील (आग्री) व गोपाळ चांगू जाधव

(अस्पृश्य) यांनी त्यांचे स्वागत करून त्यांना पुष्पहार अर्पण केले. बंदरावर

डॉ. आंबेडकरांच्या स्वागतासाठी नारायण नागोजी पाटील, सौ. पाटील, अनंतराव

चित्रे, श्री. कोवळे व श्री. सुरबा टिपणीस वगैरे कुलाबा व रत्नागिरी जिल्ह्यातील

शेतकरी पुढारी उपस्थित होते.

यानंतर महाडास जाता गडप गावच्या शेतकऱ्यांतर्फे श्री. दामोधर खंडू पाटील

या आग्री पुढाऱ्याने त्यांचे स्वागत करून त्यास पुष्पहार अर्पण केला.

कोलाड येथे रावसाहेब बारटक्के, श्री. किंजळे, पुना म्युनिसीपालिटीचे माजी

नगराध्यक्ष, श्री. शेखा खोत व श्री. जोसेफ खोत यांनी त्यांचे स्वागत केले.