३२८ डॉ, बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
यानंतर इन्दापूर येथे श्री. बापूसाहेब देशमुख यांनी डॉ. साहेब
पाहुणे मंडळी यांचे टोलेजंग स्वागत करून त्यांना अल्पोपहार दिला. या
समारंभात कु. भागीबाई तुकाराम गायकवाड या अस्पृश्य तरुणीने
भाग घेतला होता. नंतर नाणगाव येथे श्री. अनंत गंगाराम खुळे व श्री.
खुळे या बंधूद्वयांनी डॉ. बाबासाहेब यांचे स्वागत करून त्यांना
अर्पण केला.
येथून पाहुणे मंडळी लोणेरे या गावी पोहोचताच तेथे श्री. पांडूरंग बुवा चोरवे
(कुणबी) या शेतकरी पुढाऱ्याने डॉ. साहेबांचे स्वागत करून त्यांना पुष्पहार अर्पण
केला.” १ |
'' महाड अस्पृश्य स्वातंत्र्य दिन--झेंडावंदन
सोमवार, ता. १९ मार्च १९४० रोजी कुलाबा जिल्ह्यातील महाडगावी १४ वा अस्पृश्य स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. या स्वातंत्र्यदिनी सकाळी महाड येथील सुप्रसिद्ध चवदार तळ्यावर 'झेंडावंदन' समारंभ साजरा करण्यात
अग्ला.
या समारंभासाठी स्वतंत्र मजूर पक्षाचे सुमारे २०० स्वंयसेवक डॉ. बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली इतर बाहेरगावाहून परिषदेसाठी आलेल्या मंडळीसह मिरवणुकीने सकाळी ११ वाजता चवदार तळ्यावर उपस्थित झाले. समारंभाच्या आरंभी श्री. मचंडे यांनी बिगूल वाजवून समारंभाच्या सुरवातीचा इशारा जमलेल्या मंडळीना दिला. यानंतर स्वतंत्र मजूर पक्षाचे कुलाबा जिल्ह्यातील सुप्रसिद्ध पुढारी श्री. सुरबा टिपणीस यांनी सभाजनास शांतता राखून समारंभ पार पाडण्याची विनंती केली.
नंतर खानदेशातील स्वतंत्र मजूर पक्षाचे पुढारी रा. दौलतराव जाधव यांनी १९२७ साली चवदार तळ्याबाबत झालेल्या लढ्याची माहिती सांगून स्वतंत्र मजूर पक्षाचा झंडा कसा विजयी झालेला आहे याचे थोडक्यात विवेचन केले.
यानंतर थोडावेळ बिगूल वादन होऊन झेंडावंदनाकरिता केलेले पदरा चंद्रकांत केशव यांनी तडफदाररीतीने झटकले व स्वतंत्र मजूर पक्षाचा झेंडा डॉ. बाबासाहेबांच्या हस्ते उभारण्यात येऊन त्याला सामुदायिकरित्या वंदन करण्यात आले.
झेंडावंदनानंतर आमदार जाधव यांनी झेंड्याला साक्षी ठेवून अस्पृश्यांनी घ्यावयाची प्रतिज्ञा जमलेल्या मंडळीस वाचून दाखविली. |
BR RR EE NE ES SP IRE ES
जनता : २३ मार्च १९४०.