डॉ. बावासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे ३३०
मिरवणुकीच्यावेळी 'स्वतंत्र मजूर पक्षाचा विजय असो." ' आंबेडकर झिंदाबाद, '
की जय,“ 'शेतकन्यांचा विजय असो,' “महात्मा फुले की जय,' “महात्मा आगरकर
'कामकऱ्यांचा विजय असो,' 'खोतशाही नष्ट करा,' 'सावकारशाही नष्ट करा," 'भांडवलशाही नष्ट करा,' 'साम्राज्यशाही नष्ट करा,' 'भिक्षुकशाही नष्ट करा," 'जातीभेदांना मूठमाती द्या,' 'अस्पृश्यता नष्ट करा,' 'समतेचा विजय असो,' 'मालकशाही नष्ट होवो, ' 'अस्पृश्य स्वातंत्र्याचा विजय असो,' वगैरे विधिनिषेधात्मक | गर्जनांनी महाडचे वातावरण दुमदुमून गेले होते.
मिरवणूक चालू असता श्री. भानुदास कांबळे व श्री. भाई शेठ वडंके या दोघांनी जुन्या पेठेत डॉ. बाबासाहेबांना पुष्पहार अर्पण केले. साळवाड्यात साळी मास्तर | यांनी त्यांना पुष्पहार अर्पण केला. सरेकर आळीत श्री. भिकोबा मालुसरे व | श्री. यशवंतराव टिपणीस यांनी त्यांचा सत्कार केला. चवदार तळ्याच्या नजीक | श्री. दगडोबा साळुंके. श्री. दत्तोबा देशपांडे व श्री. चिंतोबा देशपांडे यांनी त्यांचा | सन्मान केला. नव्या पेठेतील महाड मुंबई मोटार युनियनतफ साळी मास्तर यांनी डॉ. बाबासाहेबांना पुष्पहारांनी मंडीत केले. |
अशा थाटाने ही टोलेजंग मिरवणूक सुमारे पाच वाजता सभास्थानी येवून | दाखल झाली व सभेच्या कार्यास सुरवात करण्यात आली.
या सभेस महाड शहराबाहेरील श्री. गोपीनाथराव पोतनीस, राजारामभाऊ भोळे, भाऊसाहेब गडकरी, आमदार सावंत, श्री. अधिकारी वकील, आमदार घाडगे व
शंकरराव खुळे ही मंडळी उपस्थित होती.
स्थानिक मंडळीपैकी रा. ब. कर्णिक, श्री. अण्णासाहेब भिलारे, यशवंतराव वीरकर, कॅप्टन जगताप, पी. बी. गांधी, हिरालाल शेठ मारवाडी, विष्णुपंत चांदे, | डॉ. चितळे, डॉ. खेडकर, बुटाला वकील, शंकरशेट डोळस, महादेवशेठ बनारसे, |
दत्तोपंत देशपांडे, हरिभाऊ बनारसे, भानुदास कांबळे, नारायणराव मांगडे व सावंत वकील वगैरे मंडळी सभास्थानी उपस्थित होती. |
सभेच्या आरंभी कु. इन्दु गुप्ते व कु. विमल गुप्ते या भगिनींनी स्वागतपर पद्य | व कु. वृंदा चित्रे यांनी आभार प्रदर्शक पद्य म्हटल्यावर सभेचे स्वागताध्यक्ष | श्री. सुरबा टिपणीस यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात नियोजित अध्यक्षांना | अध्यक्षस्थान स्वीकारण्याची विनंती केली. |
श्री. सुरबाच्या भाषणानंतर श्री. नारायणराव पाटील यांनी अध्यक्षांच्या | निवडणुकीच्या सुचनेस पाठिंबा दिला.