१९-३-१९४० नुसत्या राजकीय स्वातंत्र्याने जनतेचे कल्याण होईल, हा भ्रम ! - Page 369

नुसत्या राजकीय स्वातंत्र्याने . . . . . . हा भ्रम ३३१

पनवेलचे आमदार भातणकर यांनी पाटलांच्या भाषणास पाठिंबा दिल्यावर

टाळ्यांच्या प्रचंड गजरात व आंबेडकर झिंदाबाद या गर्जनात डॉ. बाबासाहेब

आंबेडकर यांनी अध्यक्षस्थान स्वीकारले.

यानंतर. अध्यक्षांच्या आदेशानुसार श्री. चिंतामणराव देशपांडे यांनी सभेस

आलेले ना. भास्करराव जाधव, श्री. केशवराव ठाकरे, दामुअण्णा पोतनीस,

वरघरकर, देवराव नाईक, कारखानीस, श्री. राजभोज, काकासाहेब

लिमये वगैरे स्पृश्यास्पृश्य पुढाऱ्यांचे संदेश वाचून दाखविले". *

“सुरवातीच्या हँडबिलप्रमाणे १९ मार्च १९४० रोजी अस्पृश्यांच्या जीवनात क्रांतिकारक बदल घडवून आणणारा महाड क्रांतीदिन, स्वातंत्र्यदिन म्हणून पाळण्याचा निर्णय घेऊन त्या दिवशी महाड येथे स्पृश्य, अस्पृश्य, मुसलमान समाजातील पंधरा ते वीस हजार लोक एकत्रित झाले होते. या जनसमुदायाला बाबासाहेब आंबेडकरांनी मार्गदर्शन केले. ते आपल्या भाषणात म्हणाले,

' सभेचा हेतू हँडबिलावर आपणास कळून चुकलाच आहे. महाडमध्ये आज सुखाचे, शांततेचे व ऐक्याचे वातावरण नांदत आहे. पण चौदा वर्षांपूर्वी, याचवेळी, याच महाडात कोण दुर्धर प्रसंग ओढवला होता त्याची आपणापैकी पुष्कळ जणांना आठवण असणारच. सन १९२७ च्या सभेस हजर असणारे सभाजन आजच्या सभेस हयात असून गैरहजर आहेत, असे सहसा होणार नाही.

ती चौदा वर्षांपूर्वीची एक मामुली सभा याच थियेटरात भरली होती. अस्पृश्यांना सार्वजनिक तळी खुली करावी असा एक ठराव त्या सभेत पास करण्यात आला. या ठरावास सर्व पक्षांच्या लोकांचा पाठिंबा मिळाला होता. या पाठिंब्याने उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग अशी आमच्या अनंतराव चित्र्यांची स्थिती झाली. आम्ही सर्व सभाजन हुरळल्या मेढीप्रमाणे चवदार तळ्यावर सामुदायिकरित्या पाणी पिण्यास गेलो. आमच्या मंडळीनी तेथे येथेच्छ जलपान केल्यावर आम्ही कृतार्थ होऊन परत आपआपल्या ठिकाणी गेलो. माझी राहाण्याची व्यवस्था त्यावेळी ' ट्रॅव्हलर्स बंगलो ' मध्ये करण्यात आली होती. मी व माझे सहकारी बंगल्यावर गेलो. आमची जेवणाची काही सोय त्या दिवशी करता येणे शक्य झाले नाही. दुपारच्या वेळी आम्हास रक्तबंबाळ झालेल्या अस्पृश्यांचे दर्शन मात्र घडून आले. महाडातील स्पृश्यांनी अस्पृश्यांना एकटे दुकटे गाठून पिटून काढले होते. स्पृश्य मारेकऱ्यांचा मोर्चा आम्हाकडे बंगल्यावर दुपारी चारच्या सुमारास आला होता. या मोर्चात सुमारे दोन हजार

HNN FPS EROS i

१ जनता : ३० मार्च १९४०.