आणि भाषणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन ३३२
देवळात डॉ. आंबेडकर जाणार अशी कंडी माणसांचा जमाव होता. विरेश्वराच्या
पण जमावाबरोबर पोलीस अधिकारी उठवून त्यांना चेतविण्यात आले होते. त्या
घाबरले असल्याने त्या दिवशी आमचे मरण टळले. पोलीस अधिकारीही त्यावेळी होते. 'मुंबईला जा नाहीतर पोलीस खात्यात राहा ' असे त्यांनी मला स्पष्ट सांगितले. जखमी लोकांना टाकून मुंबईला जाणे मला शक्य नव्हते. म्हणून मी पोलीस खात्यात राहू लागलो. श्री. सुरबा टिपणीस यांनाही लोकांची भीती होतीच. तरी देखील ते मला थोडे फार चोरून मारून अन्न पुरवीत असत. वीर गावचा म्हातारा वीरकर मात्र नित्य नेमाने मला जेवण आणीत असे.
सन १९२७ साली डिसेंबर महिन्यात आम्ही सत्याग्रहासाठी पुन्हा सभा भरविण्याचे ठरविले. आम्हावर मनाई हुकूम बजावण्यात आला. लोक मनाई हुकूम तोडण्यास एका पायावर तयार होते. पण आमच्या सभेत सनदशीर मार्गाने
जाण्याचे धोरण ठरविण्यात आले. पुष्कळ मित्र नाराज झाले. शत्रु आम्ही तुरुंगाला भितो असे म्हणू लागले. पण आमचे धोरणच रास्त होते, असे
इतिहासाने सिद्ध केले आहे.
आजच्या सभेत स्पृश्य, अस्पृश्य, हिंदू, मुसलमान खांद्याला खांदा लावून बसले आहेत. त्यावरून आमचेच धोरण बरोबर होते, हेच सिद्ध होत नाही काय ?
आज आपण अस्पृश्यांचा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी. जमलो आहोत. अस्पृश्यांचे स्वातंत्र्य हा बहुतांशी सामाजिकच प्रश्न आहे. या प्रश्नाचे मी आज सिंहावलोकन करणार आहे. सामाजिक स्थित्यंतराचा मी आज विचार
करणार आहे. राजकीय चळवळीविषयी या सभेत मी फारसे लक्ष देणार नाही.
नुसत्या राजकीय स्वातंत्र्याने जनतेचे कल्याण होईल, हा भ्रम आहे. इंग्रज गेला की आपण सुखी होऊ, अशी खात्री कोणासही देता येणार नाही. जगातील अनेक स्वतंत्र देशातील जनता आजही दु:खी कष्टी आहे, असे अनुभवाने दिसून
येते. रुमानिया, अल्बेनिया, सर्व्हिया व युगोस्लोव्हाकिया हे देश स्वतंत्र
आहेत. पण ते सुखी आहेत काय ? फिनलँड व रशिया यांची स्थिती आपल्या
डोळ्यांपुढे आहेच. ज्या राष्ट्रात समाजस्थिती सुव्यवस्थित तेच राष्ट्र स्वातंत्र्य
मिळवून टिकवू शकते. कै. सर. टी. माधवराव या हिंदी पुढाऱ्याने एका ठिकाणी
असे म्हटले आहे की ' जनतेच्या दुःखाला सामाजिक दु:स्थितीच कारणीभूत होत असते ' आपली सामाजिक चौकट आर्य संस्कृतीने हाडकासारखी कठीण करून सोडली आहे. तिच्यामध्ये लवचिकपणा मुळीच उरला नाही. परिस्थितीनुरूप तिच्यात फेरफार करणे सुकर होत नाही. आर्य संस्कृती श्रेष्ठ मानून तिला उराशी कवटाळण्यात अर्थ नाही. या संस्कृतीचा मानीव श्रेष्ठपणा हा निव्वळ