नुसत्या राजकीय स्वातंत्र्याने . . . . . . हा भ्रम ३३३
भ्रम आहे. आर्यांची अमानुष हिंसावृत्ती त्यांच्या यज्ञसंस्थेने चांगलीच प्रतीत
होते. यज्ञात अगणित परशुंचे हनन आर्य लोक बेदरकारपणे करीत
असत. एका एका यज्ञात पाच सातशे पशू धर्माच्या नावाखाली मारले
जात. आर्य लोक हे पट्टीचे सोमपान करणारे असत. त्यांच्याइतके दारूबाज
क्वचितच पाहावयास मिळतील. ते शूद्रांना तुच्छ मानीत व स्त्रियांना शूद्रा-
पेक्षाही हीन मानीत. आपल्या माय बहिणीच्या स्त्री-जातीला हीन मानणाऱ्या या
आर्यांची संस्कृती काय दर्जाची होती, हे सांगणे नकोच. याच आर्यांनी चार
बर्ण करून समाजाचे तुकडे पाडले व शूद्रांना हीन स्थितीत नेऊन लोटले. ही
आर्य संस्कृतीच आजच्या आपल्या .हीन स्थितीस कारणीभूत झाली आहे.
भगवान बुद्धाने ही दुःस्थिती सुधारण्याचा प्रयत्न केला. त्याने यज्ञसंस्थेला
विरोध केला. स्त्रिया, शूद्रांची स्थिती सुधारण्याचे प्रयत्न केले व मद्यपानासही
बंदी केली. | |
पण ब्राह्मणी धर्माला हा बुद्ध धर्म मानवला नाही. त्या धर्माच्या विरोधापुढे
बुद्ध धर्म तगला नाही.
बुद्धानंतरही अनेकांनी समाज सुधारण्याचे प्रयत्न केले. पण ते सफल झाले
नाहीत.
अगदी अलीकडच्या काळातही कै. आगरकर व महात्मा जोतिबा फुले यांनी
समाज सुधारण्याचे भगीरथ प्रयत्न केले. हे सर्व अतिरथी-महारथी थकले, पण
आपल्या गेल्या पंधरा वर्षाच्या चळवळीस मात्र थोडेफार यश मिळाले आहे, ही आनंदाची गोष्ट होय.
चवदार तळ्याचा लढा हा समाजसमतेचा लढा होता. या लढ्याचे परिणाम दूरवर पोहचले आहेत. ते अवलोकन केल्यानेच या लढ्याचे व्यापक स्वरूप ध्यानात येते. हा लढा सुरू झाल्यापासूनच आपण मृतमांस भक्षणाची व गावात तुकडे मागून पोट भरण्याची दुष्ट चाल सोडून दिली आहे. . आपल्या या चळवळीच्या सुरवातीस आपणातील रूढ चाली पाळणारे 'आपले पूर्वज मूर्ख होते काय ? ' असा प्रश्न आम्हास विचारीत असत. यावरून त्यावेळेच्या जनमनाची वृत्ती कळून येते. आज ही वृत्ती पालटली आहे. हा पालट चवदार तळ्याच्या लढ्यातूनच उत्पन्न झाला आहे. आपल्या लोकात नानातऱ्हेच्या देवदेवतांचा बुजबुजाट होता. आपणात खंडोबा व मुरळयांचे प्रस्थ फार माजले होते. आता आपणातून पूर्वीच्या भूताखेतांची व देवदेवतांची हकालपट्टी झालेली आहे. आज महार समाजाची कायिक, मानसिक व आत्मिक अशी त्रिशुद्धी झालेली आहे. आपण आजचा हा स्वातंत्र्य दिन पाळण्यास सर्वतोपरी लायक झालेलो