१९-३-१९४० नुसत्या राजकीय स्वातंत्र्याने जनतेचे कल्याण होईल, हा भ्रम ! - Page 372

आणि भाषणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन ३३४

' गोष्ट ध्यानात धरा. चवदार आहो. ' मन स्वतंत्र तर मनुष्य स्वतंत्र ही

झाला हा पक्ष या तळ्याच्या लढ्यातून स्वतंत्र मजूर पक्षाचा उगम आहे.

लढ्याची राजकीय फलश्रुतीच होय. चवदार तळ्याच्या लढ्यानेच आपल्या

वर्गात राजकीय, सामाजिक, आर्थिक जागृती झाली आहे, ही गोष्ट कोणीही

विसरता कामा नये.

या लढ्याचा स्पृश्य वर्गावरही परिणाम झालाच आहे. महाराष्ट्रात महाडकरांचा

पहिला नंबर लागतो, तो या लढ्यामुळेच. ही जागृती व ही प्रगती संग्रामजन्यही

होत. चौदा वर्षापूर्वी फुटलेल्या डोक्यांनी ही जागृती व ही प्रगती घडवून

आणलेली आहे. येथे जमलेल्या कुणबी व मराठा बांधवांना मी आता दोन शब्द

सांगणार आहे. ते त्यांनी लक्ष देऊन ऐकावे.'

महार समाजात सध्या स्पृहणीय जागृती झाली आहे. महाराष्ट्रापुरतेच

बोलावयाचे तर महार व ब्राह्मण यांनाच राजकारण कळते, असे म्हणण्याची पाळी

आली आहे. कुणबी-मराठ्यांमध्ये जागृती नाही.

अशी परिस्थिती का असावी याचा तुम्ही विचार करावयास इवा. तुम्हामध्ये आपण महारांपेक्षा श्रेष्ठ, असा अभिमान भरपूर आहे. पण महारापेक्षा मोठे होण्यात काय भूषण आहे, ते मला समजत नाही. समाजाच्या तळाच्या लोकांशी ताठ्याने वागण्यात पुरुषार्थ कोणता ?

कुलाबा जिल्ह्यात सात मामलतदार आहेत, त्यातले कुणबी-मराठ्यांचे किती आहेत, याचा तुम्ही विचार करावयास हवा. अधिकारी वर्गात तुमचे लोक किती आहेत ? प्रांताधिकारी तुमच्यापैकी आहेत काय? कलेक्टर तुमच्यापैकी आहेत काय ? या महत्त्वाच्या गोष्टींचा तुम्ही विचार करावयास हवा. तुम्ही ७० टक्के, ८० टक्के लोक आहात. निव्वळ झाडूवाले व पट्टेवाले याजकडे पाहूनच का तुम्ही अभिमान बाळगणार ?

महार समाज खंबीर बनला आहे. आता तो बुडणार नाही व तुमच्या पायाखालीही राहणार नाही, ही गोष्ट ध्यानात बाळगा. यापुढे तुम्हीतरी जागे व्हा. तुम्ही ७०-८० टक्के लोक असता तुम्हाला निव्वळ हमाली करण्यात आयुष्य कंठावे लागावे, कोण ही तुमची दैना ?

तुम्ही कॉंग्रेसला मिळालात तरी काँग्रेस तुम्हाला स्वतंत्रपणे वावरू देणार नाही. तुम्हाला काँग्रेसचे. गुलाम म्हणूनच राबावे लागेल, हे लक्षात ठेवा. आमच्या स्वतंत्र मजूर पक्षाचा पाया महारच होत. धार्मिक, सामाजिक,