१९-३-१९४० नुसत्या राजकीय स्वातंत्र्याने जनतेचे कल्याण होईल, हा भ्रम ! - Page 373

नुसत्या राजकीय स्वातंत्र्याने . . . . . . हा भ्रम ३३५

राजकीय व आर्थिकदृष्ट्या पिळल्या जाणाऱ्या आपल्या समाजाच्या तळाच्या वर्गजागूतिवरच स्वतंत्र मजूर पक्षाचा पाया रचला असल्यामुळे तो पक्ष अभेद्य असाच राहणार आहे, हे निश्‍चित समजा.

आमची शिडी घेऊन तुम्ही कामास लागा. पण आपण आपली स्वत:ची शिडी तयार करण्यास मात्र विसरू नका. आमच्या अस्पृश्यांनी विटाळलेल्या पक्षास, नको असेल तर लुम्ही मिळू नका. पण आम्ही जी कासवाची पाठ तयार केली आहे तिचा अवलंब करून आपल्या दुःखसागरातून तरून जाण्यास मात्र अनमान

करू नका, हेच माझे तुम्हास सांगणे आहे." १

'“ अध्यक्षीय भाषणानंतर महाड तालुका, माणगाव व मुंबईतील फोट भागात राहणारे कुलाबा रहिवासी यांनी डॉ. साहेबांस रु. ३१८, रु. २१० व रु. ३१ च्या

थैल्या अर्पण केल्या.

डॉ. बाबासाहेबांनी यापैकी अर्धी रककम महाड येथील सुभेदार सवादकर बोर्डिंग या संस्थेस व राहिलेली रक्कम स्थानिक कार्यास देण्यात येईल असे जाहीर केले.

रा. जाधवांच्या भाषणानंतर मडकेबुवा जाधव यांनी स्वतंत्र मजूर पक्षाच्या सभासदांची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करणे जरूर आहे असे सांगितले. सभेच्या शेवटी दोन अस्पृश्य मुलांनी अस्पृश्य चळवळीस पोषक अशी पद्ये गाऊन दाखविली व रा. पोतनीस यांनी सर्वाचे आभार मानण्याचा ठराव

मांडला. | |

आभारदर्शक ठरावानंतर, स्वतंत्र मजूर पक्ष कुलाबा जिल्हा, सुभेदार सवादकर बोर्डिंग, महाड, स्वतंत्र मजूर पक्ष, माणगाव तालुका, श्री. सुरबा टिपणीस, महाड, श्री. ओहोळ मास्तर, श्री. शंकरशेठ खुळे व श्री. भास्करशेठ खुळे यांच्यातफ बाबासाहेबास पुष्पहार अर्पण करण्यात आल्यावर सभा समाप्त झाली.

हा स्वातंत्र दिन पार पाडण्याचा श्री. राधो दगडू ओहोळ, विठोबा गणपत वरघरकर, देऊ रामा जोजी, यशवंत भिकाजी साळवे, लक्ष्मण विरकर, भिकू राया महाडकर व गुणाजी देवजी कोलकर यांनी अत्यंत परिश्रम केले म्हणून त्यांचे मानावे तितके आभार थोडेच होत.“ *

oS

१ जनता : ३० मार्च १९४०.

२ तत्रैव.