१७५
व्यवहारज्ञान व शील [हे ] [महाराष्ट्रीयांचे ]
दोन गुण होत असे [माझे ] [मत ] [आहे ]
ता. १९ मार्च १९४० रोजी महाड येथे डॉ. बाबासहिब आंबेडकर अस्पृश्य स्वातंत्र्य दिनानिमित्त आले असताना त्यांना महाड म्युनिसीपालिटीने मानपत्र अर्पण केले. त्या प्रसंगी महाड म्युनिसीपालिटीचे सभासद व महाडातील प्रमुख नागरिक हजर होते. रा. खोडके यांनी मानपत्र वाचले. मानपत्र येणे प्रमाणे-
डॉ. भीमराव रामजी आंबेडकर,
एम. ए., पीएच. डी., (कोलंबिया), डी. एससी., (लंडन), बार अँट लॉ.,
एम. एल. ए., जे. पी., मुंबई, यांचे सेवेशी,
विद्वत्मान्य भारतभूषण डॉक्टरसाहेब,
बरोबर तेरा वर्षापूर्वी ता. १९ मार्च १९२७ रोजी आमच्या या महाड शहरात ' आपल्या नेतृत्वाखाली अस्पृश्य जनतेने चवदार तळ्यात पाणी भरून आपला नागरिक समानतेचा जन्मसिद्ध हक्क प्रस्थापित केला. त्या ऐतिहासिक प्रसंगाची स्मृती जागृत ठेवण्याच्या हेतूने ता. १९ मार्चचा आजचा दिवस ' अस्पृश्य-स्वातंत्र्य दिन ' म्हणून साजरा करण्याच्या निमित्ताने आपण येथे आला आहात. अशा या ऐतिहासिक महत्त्वाच्या प्रसंगी महाड शहरातील नागरिकांतफे आम्ही महाड म्युनिसीपालिटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सभासद आपले हार्दिक स्वागत करतो.
विद्यार्थीदशेत आपण नाना प्रकारचे कष्ट सोसून ज्ञानार्जन केलेत. आपली असामान्य बुद्धिमत्ता व ज्ञानलालसा पाहून कै. श्रीमंत सर सयाजीराव महाराज गायकवाड यांनी आपल्याला परदेशी जाऊन ज्ञान संपादन करण्याची संधी आणि साधन प्राप्त करून दिले. तत्त्वज्ञान, राजकारण, शास्त्र, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, कायदा वगैरे गहन विषयात.आपण स्वदेशी व परदेशी विश्वविद्यालयात पारंगतता प्राप्त करून घेतली आहे. केवळ स्वार्थबुद्धीने आपण मोठ्या अधिकाराच्या सरकारी नोकरीचा हेतू धरला असता तर आपल्या थोर विद्ठत्तेच्या बळावर आपल्याला सहज साध्य करून घेता आला असता, परंतु आपण सरकारी नोकरीच्या मोहपाशात न सापडता आपल्या स्वतंत्र वृत्तीला साजेसा बॅरिस्टरचा पेशा पत्करला व उत्तम कीर्ती संपादन केली.
जनता : २३ मार्घ आणि ३० मार्च १९४०.