१७८
वृत्तपत्र हे चळवळीचे प्रभावी साधन
सोमवार, ऑगस्ट २६, १९४० रोजी रात्रौ पोयबावडी, परळ, [मुंबई ] [येथील ] [समाज ]
सेवा संघाच्या दामोधर [हॉलमध्ये ] [मुंबई ] [म्युनिसीपालिटीत ] [काम ] [करणारे ] [अस्पृश्य ] कामगार जमले होते. हॉल चिक्कार भरून गेला [होता. ] ९ [वाजता ] [अस्पृश्यांचे ]
कर्णधार डॉ. बाबासाहेब [आंबेडकर ] [सभास्थानी ] [हजर ] [झाले ] [व ] [श्रोतृवृंदानी ]
टाळ्यांच्या कडकडाटात [त्यांचे ] [प्रेमाने ] [स्वागत ] [केले. ]
सभेच्या आरंभी म्युनिसीपल कामगार संघाचे चिटणीस भाई प्रधान यांचे भाषण झाले. नंतर डॉ. बाबासाहेब यांचे भाषण झाले. ते आपल्या भाषणात म्हणाले, भगिनींनो आणि बंधुनो,
संघाच्या विद्यमाने जरी तुम्ही येथे जमला असलात तरी त्या संघासंबंधी आज मी तुम्हास काही सांगणार नाही. मी आज तुम्हाला अत्यंत महत्त्वाची अशी गोष्ट सांगणार आहे. ती ऐकून घेण्याकरता व यशस्वीपणे पार पाडण्याकरता मी तुम्हाला आज येथे बोलाविले आहे. आपल्या सर्व चळवळीचे सार आपल्या
वर्तमानपत्रात आहे आणि ते वर्तमानपत्र गेली २०-२२ वर्षे कोणत्या ना कोणत्या
तरी स्वरूपात तुमच्यासमोर आहे. प्रथम मूकनायक, नंतर बहिष्कृत भारत व
आजची जनता ही त्यांची निरनिराळी स्वरूपे आहेत. जनतेस जन्म देणारा
भारत भूषण छापखाना आहे. ह्या दोन्ही संस्था मांजरीच्या पिल्लांप्रमाणे मी
सांभाळल्या आहेत. एका जागेवरून दुसऱ्या जागेवर पिल्लांचे संरक्षण
करण्याकरिता मांजरीला नाचावे लागते. त्याचप्रमाणे जनता व छापखाना यांना
मला अनेक संकटातून वाचवावे लागले आहे. पण अशी स्थिती नित्याची होऊन
भागणार नाही.
जनता व छापखाना याजवर परत आज संकट ओढवले आहे. ती ज्या
जागेत आहेत ती जागा सोडून जाण्याबद्दल मला नोटीस लागली आहे. म्हणून
जनता व प्रेस ह्यांना आता दुसरीकडे निवाऱ्याच्या जागेवर नेणे प्राप्त आहे. ही
निवाऱ्याची जागा यापुढे तरी तात्पुरत्या स्वरूपाची असता कामा नये. म्हणून
आपली स्वत:ची इमारत बांधणे हा अगदी तातडीचा प्रश्न झाला आहे. हा प्रश्न
NO CSREES NONE जवल
जनता : ३१ ऑगस्ट १९४०.